शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मी महामार्गास विरोध करायला आलेलो नाही

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मी आलेलो नाही. शेतकऱ्यांचे त्या महामार्गाच्या बाबतीत काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्यासाठी मी परिषदेसाठी हजर राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मी आलेलो नाही. शेतकऱ्यांचे त्या महामार्गाच्या बाबतीत काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्यासाठी मी परिषदेसाठी हजर राहणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.लवासा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, महामार्ग क्रमांक ९ हे आपले सरकार असताना झाले, त्यावेळी भूसंपादन करावे लागलेच. मग मराठवाड्यातील या महामार्गाला आपला विरोध हा राजकीय आहे की शेतकऱ्यांसाठी. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, राजकीय विरोध नाही. मी विरोधासाठी आलेलो नाही. सर्व शेतकरी मला भेटले होते, त्यांचे म्हणणे मला ऐकून घ्यायचे आहे. मोबदला व्यवस्थित मिळत नाही का? त्याबाबत वेगळा विचार होणे गरजेचे आहे काय. यावर विचार होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांची जमीन घेतल्यानंतर त्याला मोबदला काय देणार याबाबत आमच्या सरकारच्या काळात समिती नेमून विचार झाला. एका एकराच्या किमतीचा विचार करून चालणार नाही. उर्वरित शेतीबाबतदेखील आम्ही विचार केला होता. आमच्या सरकारच्या काळात बाजारभावापेक्षा चौपट कॉम्पेन्सेशन दिले गेले होते. विभागाचा विकास रोखण्याशी काहीही संबंध नाही. विकास झालाच पाहिजे, तो हवेत होत नसतो. त्यासाठी जमीन हवी असते. परंतु बहुसंख्य लोकांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असेली जमीन काढून घेतली तर तो उद्ध्वस्त होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन गेली तर त्याची पुढची पिढीदेखील बरबाद होते. शेतीमधून महामार्ग जाणार असेल तर उर्वरित शेती करणे किती अवघड होणार आहे. मराठवाडा म्हणून विरोध करायची अशी भूमिका नाही. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.सतीश चव्हाण, अभिजित देशमुख यांची उपस्थिती होती. शेतकरी म्हणतील ते करू ...यासंबंधी १६ ते १७ तालुक्यांतील शेतकरी पक्ष कार्यालयात भेटले. त्यांनी वेगवेगळ्या व्यथा मांडल्या. त्यामुळे ठरविले की शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शासनाशी बोलू. राज्य शासन दुरुस्ती करणार असेल तर समन्वयाची भूमिका ठेऊ. जर शासनाने समन्वयाबाबत विचार केला नाही आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना विचारू की बाबांनो आता पुढे काय करायचे आहे. शेतकरी म्हणतील ते आम्ही करू.