शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोयता नगं सायेबं, मला शिकायचयं !

By admin | Updated: October 29, 2015 00:23 IST

बीड : आई- वडिलांसोबत स्थलांतर केल्यानंतर अनेक पाल्यांचे भवितव्य अंध:कारमय होते;परंतु काही मुलांना शिक्षणाची ओढ असते.

बीड : आई- वडिलांसोबत स्थलांतर केल्यानंतर अनेक पाल्यांचे भवितव्य अंध:कारमय होते;परंतु काही मुलांना शिक्षणाची ओढ असते. असाच एक मुलगा आई- वडिलांसोबत कारखान्यावर निघाला होता;परंतु अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यावर त्याने ‘हो, मला शिकायचयं’ असे सांगितले. त्याला हंगामी वसतिगृहात ठेवायला आई- वडील तयार झाले अन् त्याच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.राहुल भारत चव्हाण (रा. पाचेगाव ता. गेवराई) असे या मुलाचे नाव. झाले असे, सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड व समन्वयक महादेव चव्हाण हे बुधवारी अंबाजोगाई दौऱ्यावर होते. पालीनजीक त्यांना एका ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरमध्ये लहान मुलगा दिसला. या मुलाच्या चौकशीसाठी त्यांनी ट्रॅक्टर थांबवले. मुलाची चौकशी केल्यावर कळाले की, त्याचे आई- वडील त्याला सोबत घेऊन जात आहेत. यावेळी उपशिक्षणाधिकारी कराड यांनी राहुलला त्याच्या आजी- आजोबांकडे ठेवून वसतिगृहात नाव नोंदवून तेथील सुविधांचा लाभ घेण्याचे सूचविले. ‘साहेब, मला शाळा शिकायचीयं, ऊसतोडीला जायचे नाही’ असे सांगून राहुलने शिक्षणाची तळमळ दाखवली. त्यानंतर तो लगेचच ट्रॅक्टरमधून खाली उतरला. पाचेगाव येथील शाळेत सातवीत शिकणाऱ्या राहुलच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची वाताहत नवी नाही;परंतु राहुलसारख्या कित्येक मुलांच्या भावना बोलक्या आहेत. (प्रतिनिधी)