शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

खैरेंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:41 IST

एकमेकांवर चिखलफेक करीत पाण्यात पाहणारे खा. चंद्रकांत खैरे आणि आ. हर्षवर्धन यांच्यात समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकमेकांवर चिखलफेक करीत पाण्यात पाहणारे खा. चंद्रकांत खैरे आणि आ. हर्षवर्धन यांच्यात समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली. आ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खा. खैरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले, तर खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्वीकारतील, असा आशावाद व्यक्त केला.शिवसेनेतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचे आयोजन तापडिया नाट्यगृहात केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. खा. खैरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रणीत गटाकडून निवडून आलेल्या ९६ सरपंचांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार संजय सिरसाट, हर्षवर्धन जाधव, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सुहास दशरथे, महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, रंजना कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.या सत्कार समारंभात आ. जाधव यांची उपस्थिती सर्वांनाच कोड्यात टाकणारी होती. आ. जाधव यांना सर्वात अगोदर बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी आता सर्व वाद निकाली निघाले असल्याचे सांगताच नाट्यगृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. कन्नड तालुक्यातील निवडून आलेल्या शिवसेनेच्या सरपंचांना प्रत्येक पाच लाख रुपयांचा आमदार फंड देणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी खैरे यांच्यासोबत नाराजी होती. त्याची कारणे वेगळी आहेत. ती नाराजी मातोश्रीवर गेल्यामुळे दूर झाली आहे. आता लोकसभा निडणुकीच्या वेळी खैरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जाधव यांनी दिली. आमदार सिरसाठ यांनीही शिवसेनेला अंतर्गत कुरघोडीच्या घटना नवीन नसल्याचे सांगितले. उलट आ. जाधव यांना लवकर कळले. कधी-कधी खैरे-कदम, खैरे-सिरसाठ, सिरसाठ-दानवे, असा संघर्ष झाल्याचे रंगविले जात असल्याचे सिरसाट म्हणाले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरपंच निवडणुकीत शिवसेनाच वरचढ ठरल्याचे सांगितले. सरपंचाचा आकडा लवकरच १०० पेक्षा अधिक होईल.सध्या शिवसेनेचे ९६ सरपंच आहेत. आणखी पाच-सहा जणांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही दानवे म्हणाले. शेवटी बोलताना खैरे म्हणाले, बºयाच दिवसांनी पुन्हा सामील झालेले हर्षवर्धन जाधव यांनी आता शिवसेनेचे सत्कार स्वीकारावेत. दुसºया पक्षाच्या मंचावर जाण्याची त्यांना गरज नसल्याचे सांगितले. पक्षात भांडणे चांगली असतातनुकतीच दोघींची भांडणे (महिला पदाधिका-यांची हाणामारी) झाली होती, या घटनेची आठवणही खैरे यांनी यावेळी करून दिली.