औरंगाबाद : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमातानगर येथे घडली.रमेश शंकर मोरे (४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, संतोषीमातानगर भागातील गल्ली नंबर ४ मध्ये रमेश मोरे राहतात. मोरे यांची पत्नी अनिता हिचे पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून काम करणाऱ्या शालूमन घोरपडे (४२, रा. प्रकाशनगर) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. मोरे दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाची चाहूल मोरे यांना लागल्यानंतर पत्नीसोबत त्यांचे खटके उडू लागले. सततच्या भांडणामुळे तो घरी येतच नव्हता. मोरे घरी आले की, अनिता भांडण उकरून काढत असायची. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. या घटनेनंतर अनिता याच भागातील आपल्या माहेरील घरी राहण्यास गेली होती. यानंतरही तिचे आणि घोरपडे यांच्यातील अनैतिक संबंध कायम होते. दरम्यान, सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मोरे घरी गेले तेव्हा घोरपडे आणि अनिता घरात होते. नवऱ्याने आपल्याला पाहिल्याने अनिता आणि घोरपडे हे घराबाहेर आले. अनिताने लोखंडी पाईपने नवऱ्याच्या डोक्यावर जोराचा हल्ला केला. त्यामुळे ते खाली पडले. यावेळी त्यांनी त्यांना ओढत घराच्या अंगणात नेले. अंगणात पाटा उचलून त्यांनी मोरे यांच्या डोक्यात घातला. मोरे रक्तबंबाळ होऊन निपचित पडले. ते ओरडत, विव्हळत असल्याचे तेथून जाणाऱ्या लोकांनी पाहिले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.पोलिसांनी केली धावपळमाहिती मिळताच पोलीस निरीक्षक नाथा जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक उपनिरीक्षक शेख हारूण, कर्मचारी सुनील जाधव, अशोक खिल्लारे, राजेश बनकर यांनी साडेतीन वाजता धावपळ करून अॅम्ब्युलन्समधून गंभीर जखमी मोरे यांना घाटीत दाखल केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश मोरे दाम्पत्याला मोठी मुलगी तर लहान मुलगा आहे. त्यांची मुलगी नर्सिंगचे शिक्षण घेते, तर मुलगा हा नववीमध्ये आहे. ही दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. ४संतोषीमातानगर येथील पंधरा बाय तीस फुटांच्या प्लॉटवरील अर्ध्या जागेत सिमेंट पत्र्याचे घर आहे तर उर्वरित जागा मोकळी आहे. त्यास त्यांनी सिमेंट पत्र्याचे शेड केलेले आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
By admin | Updated: July 7, 2015 00:57 IST