शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

By admin | Updated: June 14, 2017 00:31 IST

जालना : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी खुनाच्या कटात सहभाग असलेल्या पत्नीस मंगळवारी अटक केली.अंबड येथील जुगलकिशोर रतनलाल लोहिया (४५) हे १७ एप्रिल २०१७ रोजी जालना न्यायालयात तारखेसाठी आले होते. ते घरी न पोहोचल्यामुळे भाऊ संतोषकुमार लोहिया यांनी तालुका ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. महिना उलटूनही जुगलकिशोर यांचा शोध लागला नाही. दरम्यान, त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद संतोषकुमार यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अंबड येथील एका संशयितास अटक केली. चौकशीनंतर न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. दरम्यान, पोलिसांनी जुगलकिशोरची पत्नी पूनम उर्फ कुसुम (३२) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिने प्रियकराकरवी पतीचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पूनमला खुनाचा कट रचल्याप्रकरणात अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली. दरम्यान, अपहरणाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या पूनमच्या प्रियकरास पुन्हा ताब्यात घेण्यात येईल. त्याने जुगलकिशोर यांचा खून कुठे, कधी, कशा पद्धतीने केला, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत पुढील चौकशी करणार असल्याचे त्रिभुवन यांनी स्पष्ट केले.