शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:03 IST

कन्नड : तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथील तरुण पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान उघडकीस ...

कन्नड : तालुक्यातील हिवरखेडा गौताळा येथील तरुण पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली.

एकनाथ आप्पासाहेब काळे (वय ३०) व भाग्यश्री एकनाथ काळे (२८) अशी दोघांची नावे आहेत. बुधवारी गौताळा अभयारण्याच्या लांबर्डीच्या खिंडीत गुरे चारण्यासाठी एक गुराखी गेला होता. उग्र वास आल्याने त्याने आजूबाजूला बघितले. तेव्हा जवळच दुचाकी (एमएच २० डीएन ५३५५) उभी दिसली. त्यानंतर मोहाच्या झाडाला पुरुष आणि स्त्री दोघे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. यामुळे घाबरून त्याने गाव गाठले व ही माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांना दिली. संजय जाधव यांनी शहर पोलीस ठाण्याला ही माहिती कळविली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, हेड कॉन्स्टेबल राठोड, पोलीस नाईक गणेश चेळेकर, बरडे यांनी घटनास्थळ गाठले. आत्महत्या केलेले पुरुष व स्त्री हे हिवरखेडा गावातील एकनाथ काळे व भाग्यश्री काळे हे दोघे पती-पत्नी असून त्यांनी एकाच दोरीने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे तपासांती स्पष्ट झाले. मृतदेह कुजण्यास सुरुवात झालेली असल्याने ही घटना सुमारे तीन दिवसांपूर्वी घडलेली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली काढून विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पती-पत्नीने आत्महत्या का केली याबाबत उशिरापर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.