शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह पतीलाही महापौरपदाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:56 IST

महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत पती-पत्नीला महापौर होण्याचा मान मिळालेला नाही. घोडेले दाम्पत्य याला अपवाद ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत पती-पत्नीला महापौर होण्याचा मान मिळालेला नाही. घोडेले दाम्पत्य याला अपवाद ठरणार आहे. रविवारी होणा-या महापौर निवडणुकीत नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात शहराचे २२ वे महापौर म्हणून माळ पडणार आहे. यापूर्वी २०१० ते २०१२ पर्यंत अनिता घोडेले यांनी महापौरपद भूषविले आहे. याशिवाय उद्या घोडेले अनेक विक्रमांचे मानकरी ठरणार आहेत.नंदकुमार घोडेले मागील तीन दशकांपासून सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. कोणत्याही वॉर्डातून उमेदवारी दिल्यास ते निवडून येण्याची क्षमता ठेवतात. २००० मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचा नक्षत्रवाडी वॉर्ड आरक्षित झाला.सेनेने त्यांना पर्यायी वॉर्डही दिला नाही. नाइलाजास्तव त्यांनी कबीरनगर वॉर्डातून पत्नी अनिता घोडेले यांचा अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा वॉर्ड ओबीसीसाठी राखीव होता. घोडेले यांनी २११ मतांनी विजय नोंदविला. अत्यंत नवख्या वॉर्डात त्यांनी १४२९ मते मिळविली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी भारिपच्या उमेदवार दीपाली कांबळे यांना १२१८ मते मिळाली होती. या निवडणुकीतही युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते.काँग्रेस मित्रपक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या.अनिता घोडेले अपक्ष असल्याने काँग्रेसने त्यांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी तयारी सुरू केली. ऐनवेळी त्यांना ‘मातोश्री’ निमंत्रण मिळाले. पहिल्याच टर्ममध्ये युतीच्या महापौर होण्याचे भाग्यही त्यांना मिळाले.