शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी धांदल!

By admin | Updated: July 28, 2016 00:48 IST

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोंढा शाखेत उडालेल्या गोंधळात कॅश काऊंटरच्या काचा फुटल्याने शाखा व्यवस्थापकाने बँकच बंद केल्याने बुधवारी शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली.

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोंढा शाखेत उडालेल्या गोंधळात कॅश काऊंटरच्या काचा फुटल्याने शाखा व्यवस्थापकाने बँकच बंद केल्याने बुधवारी शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान, गर्दी वाढूनही पोलिस बंदोबस्त नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी रेटारेटीतून मार्ग काढावा लागत आहे. यासाठी बँकेकडूनही नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील जि.म.स. बँकेच्या मोंढा शाखेला जालना तालुक्यातील १२ सोसायट्या जोडलेल्या आहेत. त्यात सुमारे १५ हजार शेतकरी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा भरण्यासाठी शेतकरी या ठिकाणी गर्दी करीत आहेत. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असल्याने बुधवारी मोंढा शाखेत शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही शाखा छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात दुसऱ्या मजल्यावर आहे. त्यामुळे खालच्या मजल्यावर शेतकऱ्यांची गर्दी झालेली होती. त्यातूनच प्रचंड रेटारेटी झाली. दुपारी चार वाजेच्या सुमारास ही गर्दी आणखीच वाढल्याने रेटारेटीत समोरील शेतकरी कॅश काऊंटरवर पडले. त्यामुळे कॅश काऊंटरची काच फुटली. ही काच फुटताच बँकेत एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळामुळे बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शाखेच्या बाहेरच उभे होते. शेवटी कंटाळून अनेक शेतकरी घराकडे परतले. (प्रतिनिधी)