शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकण्यासाठी जागेची शोधाशोध

By admin | Updated: October 12, 2016 01:11 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला गेल्या काही वर्षांपासून कचरा फेकला जात आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला गेल्या काही वर्षांपासून कचरा फेकला जात आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने रुग्णांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. ओला-सुका कचऱ्यासह वैद्यकीय घनकचराही उघड्यावर टाकला जातो. हा प्रकार रोखण्यासाठी व परिसर दुर्गंधीमुक्त होण्यासाठी घाटी प्रशासनाने ओला-सुका कचरा टाकण्यासाठी आता अन्य जागेची शोधाशोध सुरू केली आहे.घाटी रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ‘इन्सिनरेटर’ बसविले. यामध्ये टाकलेला कचरा उच्च उष्णतेमुळे जळतो. याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. प्रारंभी या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यात आला; परंतु काही कालावधीनंतर ही यंत्रणा बंद पडली. तेव्हापासून ही यंत्रणा सुरू झालेली नाही. त्यानंतर घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीकडून दररोज रुग्णालयातील घनकचरा उचलण्यात येतो. रुग्णालयातील ओला-सुका कचरा मनपातर्फे उचलण्यात येतो. जमा होणारा हा सर्व कचरा ‘इन्सिनरेटर’च्या जागेसमोर फेकला जातो. बाजूलाच मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाची इमारत आहे. कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. गेली काही वर्षे या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले.ओला-सुका कचऱ्याबरोबर या ठिकाणी सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, काढलेले प्लास्टर, तपासणी केलेल्या रक्ताच्या बाटल्या, वापरलेले रबरी हातमोजे आदी वैद्यकीय घनकचराही उघड्यावर फेकला जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला. या प्रकारामुळे रुग्णांबरोबर कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. हा प्रकार तात्काळ थांबविण्यासाठी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. घनकचरा उघड्यावर फेकला जाणार नाही, याची काळजी घेण्याची सक्त सूचना करण्यात आली.