लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने आलेली खतांची शेकडो पोती शनिवारी (दि.३) रात्री पडलेल्या पावसामुळे भिजली. उघड्यावर पडलेली खतांची पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. परंतु तरीही खतांचा बचाव होऊ शकला नाही.रेल्वेस्टेशन मालधक्क्यावर दोन दिवसांपूर्वी आलेल्या मालगाडीतील खतांची पोती उघड्यावर उतरविण्यात आली होती. ही पोती उचलण्याचे काम सुरू होते. शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खतांची अनेक पोती भिजली. ही पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. मात्र तरीही अनेक पोती भिजली. यात अनेक पोत्यांमधील दाणेदार खताचा (१०-२६-२६ आणि १४-३५-१४) चक्क चिखल झाला होता. याठिकाणी युरियाचीही अनेक पोती भिजलेली दिसून आली. पाण्यामुळे दाणेदार युरियाची पोती कडक झाली होती. ही भिजलेली पोती रविवारी (दि.४) तशीच ट्रकमध्ये लोड केली जात होती. आधीच शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत आहे. त्यात पेरणीपूर्वीच खत भिजण्याचा प्रकार झाला. ही पोती अशीच शेतकऱ्यांपर्यंत जाईल, त्यामुळे त्याची गुणवत्ता किती कायम राहील, असा प्रश्न निर्माण होत आहे.रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालधक्क्यावर खत आले आहे. परंतु पावसात भिजण्याच्या प्रकाराविषयी काहीही माहीत नाही.
खतांची शेकडो पोती भिजली
By admin | Updated: June 5, 2017 00:32 IST