सिल्लोड : वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सिल्लोड तालुक्यातील चिंचवन येथे निसर्गप्रेमींनी श्रमदानातून शंभर वडाच्या रोपांची लागवड केली. येथील पुरातन ३५० वर्षापूर्वीच्या वडाची हेरिटेज ट्री म्हणून नोंद शासनदरबारी व्हावी, अशी मागणी यावेळी पर्यावरणप्रेमींनी केली. तर वृक्षप्रेमी संस्थेचे डॉ. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने राज्य वारसा वृक्ष समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे.
वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमींनी येथे श्रमदान करून शंभर वडाची रोपे लावण्याचा उपक्रम राबविला. आता हा वारसा पुन्हा वृद्धिंगत होऊन पूर्ण दहा एकर जमिनीवर वडाची झाडे लावण्याचा व या तीर्थक्षेत्रास भरीव निधी देण्याचा मानस जि. प. सदस्य अशोक गरुड यांनी व्यक्त केला. यावेळी मुर्डेश्वर संस्थानचे ओंकारगिरी महाराज, हभप मनोज महाराज, वृक्षमित्र दत्ता पाटील, अभिनव प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण पा. पवार, औरंगाबादेतील वृक्षमित्र मिलिंद गिरीधारी, रोहित ठाकूर, प्रवीण मोगरे, डॉ. संतोष पाटील यांची उपस्थिती होती.
--
फोटो
230621\img-20210623-wa0306.jpg
वृक्षारोपण करताना निसर्गप्रेमी