शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शहर आराखडा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित; शेकडो प्रकल्प रखडून कोट्यावधींच्या गुंतवणुकीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:09 IST

खुंटलेल्या विकासाला गती द्या : शहर विकास आराखडा  सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या आराखड्यावर कोणताच निर्णय होत नसल्याने शहरातील शेकडो लहान-मोठे प्रकल्प रखडले आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या नगररचना विभागाने २०१३ मध्ये विकास आराखडा तयार करून महापालिकेला सादर केला. या आराखड्यावर असंख्य नागरिकांचे आक्षेप होते.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : शहर विकास आराखडा  सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या आराखड्यावर कोणताच निर्णय होत नसल्याने शहरातील शेकडो लहान-मोठे प्रकल्प रखडले आहेत. महापालिका प्रशासन सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत नवीन बांधकाम परवानगी देण्यास तयार नाही. शहरात होणारी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक ब्लॉक झाली आहे. विकास आराखड्याचा एकदाचा सोक्षमोक्ष तरी लावा, अशी मागणी होत आहे.       

विद्यमान महापौरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका चालविण्यास असहमती दर्शविल्यास शहर विकासाला मोठी चालना मिळू शकते.शासनाच्या नगररचना विभागाने २०१३ मध्ये विकास आराखडा तयार करून महापालिकेला सादर केला. २०१४ मध्ये सर्वसाधारण सभेने विकास आराखड्यात आमूलाग्र बदल करून मंजुरी दिली. या आराखड्यावर असंख्य नागरिकांचे आक्षेप होते. आराखड्याला सर्वसाधारण सभेने चुकीच्या पद्धतीने मंजुरी दिली म्हणून खंडपीठात आव्हान देण्यात आले.

खंडपीठाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर तत्कालीन महापौरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, तेव्हापासून आजपर्यंत हे प्रकरण प्रलंबित आहे. याचिका दाखल करणाऱ्या महापौरांचा कार्यकाल संपला. त्यानंतर भाजपचे बापू घडामोडे यांनी शपथपत्र दाखल करून याचिका पुढे चालू ठेवण्याची विनंती केली. आता विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांनी याचिका पुढे चालू ठेवायची किंवा नाही यावर सर्वोच्च न्यायालयात कोणतेच शपथपत्र दाखल केलेले नाही. ९ डिसेंबर रोजी विकास आराखड्याची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले. शहराच्या विकासाला खीळ बसेल, असा कोणताही निर्णय पक्ष घेणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मनपा प्रशासन प्रतिवादी तरी...सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याचे प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात मनपा आयुक्तांना महापौरांतर्फे प्रतिवादी करण्यात आले आहे. याच प्रकरणात न्यायालयीन खर्चापोटी, वकिलांच्या फी पोटी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल ६५ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. आयुक्तांच्या विरोधात असलेल्या याचिकेत महापालिकेनेच तिजोरीतील पैसा खर्च करण्यात आला.

ग्रीन झोनमध्ये अतिक्रमण१९९१ च्या शहर विकास आराखड्याला २०१३-१४ मध्ये सुधारित करण्यात आले. ९१ च्या विकास आराखड्यानुसार शहराच्या आसपास यलो झोनच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, पैठण रोड आदी भागांत झपाट्याने ग्रीन झोनमध्ये अनधिकृत प्लॉटिंग होत आहे. नागरिकांना घरे बांधण्यासाठी विकास आराखड्यात जागाच नाही. सुधारित विकास आराखड्यात ग्रीन झोनला यलो झोन करण्यात आले आहे.

चुकीच्या आरक्षणांचा मनस्ताप९१ च्या सुधारित विकास आराखड्यानुसार अनेक खाजगी जमिनींवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत. जुन्या आराखड्यानुसार खाजगी जमीन मालकांनी भविष्याचे प्लॅनिंग करून ठेवले होते. आरक्षणांमुळे त्यांना मागील तीन वर्षांपासून जमिनींचा निव्वळ सांभाळ करीत बसावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा धाक दाखवून महापालिका जमीन मालकाला काहीच करू देत नाही. शेकडो मोठे प्रकल्प यामुळे रखडले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय