राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यातील रस्त्यावर भरधाव वेगात धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीतील ‘अर्थ’कारणाच्या खेळात गेल्या दोन वर्षांत शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. कल्लूरनजीकच्या घटनेनंतर प्रशासनाचा धाक ओसरल्याचेच दिसून येते. बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे सुरु असलेली अवैध प्रवासी वाहतूक मोडीत काढण्यासाठी परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासन पुढाकार घेणार का? हाच सध्या कळीचा मुद्दा आहे. महिन्याकाठी ‘मंथली’च्या नावाखाली या व्यवसायात लाखो रुपयांची आार्थिक उलाढाल होत असल्याने, यावर कोणालाच कारवाई करावीशी वाटत नाही. अनेकांचे आर्थिक ‘गणित’ या व्यवसायात गुंतल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला पाठबळ दिले जात आहे. याच पाठबळामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रस्ता अपघातात शेकडो प्रवाशांचा बळी गेला आहे.
‘अर्थ’कारणाच्या खेळात शेकडो प्रवाशांचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:12 IST