शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयचे शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:50 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेऊन प्रशिक्षण (अ‍ॅप्रेंन्टिसशिप) कालावधीनंतर मंगळवारपासून घेण्यात येणाºया लेखी परीक्षेला शेकडो विद्यार्थी हॉलतिकीट मिळाले नसल्यामुळे मुकणार आहेत. यात महाविद्यालय प्रशासनाने चूक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर प्राचार्यांनी हे आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनीच आॅनलाइन अर्ज भरले नसल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेऊन प्रशिक्षण (अ‍ॅप्रेंन्टिसशिप) कालावधीनंतर मंगळवारपासून घेण्यात येणाºया लेखी परीक्षेला शेकडो विद्यार्थी हॉलतिकीट मिळाले नसल्यामुळे मुकणार आहेत. यात महाविद्यालय प्रशासनाने चूक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर प्राचार्यांनी हे आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनीच आॅनलाइन अर्ज भरले नसल्याचे सांगितले.आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष कोणत्याही कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागते. वर्षभर काम केल्यानंतर त्याविषयी लेखी परीक्षा घेण्यात येते. ही लेखी परीक्षा मंगळवापासून तीन दिवस शहरातील एका केंद्रावर होणार आहे. यासाठी २५ आॅक्टोबरपर्यंत परीक्षेसाठीचा अर्ज आॅनलाइन भरणे आवश्यक होते. या मुदतीत अर्ज भरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट मिळालेले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालय प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे ही चूक घडली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या चुकीची किंमत विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे; मात्र ओळखीच्या विद्यार्थ्यांना २५ आॅक्टोबरनंतरही अर्ज केल्यानंतर हॉलतिकीट देण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. हॉलतिकीट न मिळालेल्यांमध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थी असून, त्याविषयी महाविद्यालय माहिती लपवून ठेवत आहे. यातील अनेक विद्यार्थी खेड्यातून शहरात शिक्षणासाठी आलेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी वाया जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य सलीम शेख यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी विद्यार्थ्यांची चूक असल्याचे सांगितले. तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी डीटीईकडे परवानगी मागितली असल्याचे सांगितले.