शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांच्या घरात सापडले दिड किलो सोनं, दोन किलो चांदी अन ४ लाखाची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:12 IST

कारवाईत पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याच्या टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील  बंगल्याची झडती घेतली.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याच्या टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील  बंगल्याची झडती घेतली. रात्रभर चाललेल्या या घरझडती मोठ्या प्रमाणात सोने, चांदी व रोकड सापडली  

औरंगाबाद: लिपीकामार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेला महानगर पालिकेचा उपायुक्त अय्युब खान नुरखान पठाण याच्या घरात दिड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५०रुपयांची सोन्याची रोकड अन विविध बँक खात्यांची पासबूक आणि अन्य महत्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. 

याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक किशोर चौधरी यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोजंदारीवरील कनिष्ठ लिपीकास सेवेत कायम करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मनपातील अस्थापना विभागाचा उपायुक्त(महसूल) अय्युब खान याने तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून वरिष्ठ लिपीक दादाराव लाहोटी याच्यामार्फत २६ आॅक्टोबर रोजी १ लाख रुपये सायंकाळी स्विकारले. याप्रकरणी आरोपीविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

रात्रभर चालली झडती या कारवाईत पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याच्या टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील  बंगल्याची झडती घेतली. रात्रभर चाललेल्या या झडतीत घरात दिड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५०रुपयांची सोन्याची रोकड अन विविध बँक खात्यांची पासबूक आणि अन्य महत्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार