शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लोहा शहरात चालतात मटक्याचे दीडशे अड्डे

By admin | Updated: September 13, 2014 23:53 IST

प्रदीपकुमार कांबळे, लोहा मटक्याच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीची स्वप्ने पाहणाऱ्यांचे दिवाळे निघत आहे़

प्रदीपकुमार कांबळे, लोहामटक्याच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीची स्वप्ने पाहणाऱ्यांचे दिवाळे निघत आहे़ गत अनेक दिवसांपासून बंद पडलेला मटका आता नव्या दमाने सुरु झाला आहे़ चक्क खुलेआमपणे चालणाऱ्या मटक्याचे लोहा शहरात तब्बल दीडशे अड्डे आहेत़ त्यात कळस म्हणजे पोलिस ठाण्यासमोरच मटका बुकींनी आपले ठाण मांडले आहे़ लोहा पोलिस ठाणेहद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत़ त्यामुळे उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या जुगारांच्या अड्ड्यांचा समावेशही आहे़ मुंबई-कल्याण नावाचा मटका शहरात राजरोसपणे प्रत्येक ठिकाणी सुरु असल्याचे पहावयास मिळते़ लोहा शहरातील शिवाजी चौक, सायाळ रोड, मुक्ताईनगर, बालाजी मंदिर परिसर, तहसील कार्यालय, जायकवाडी परिसर, बसस्थानक व परिसर, शिवकल्याणनगर, बैल बाजार, जुन्या लोह्यातील भोईगल्ली, नवी आबादी आदी ठिकाणी मटक्याची दुकाने थाटली आहेत़ मटका घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेकांचे पाय भल्या पहाटेच शहराकडे वळत आहेत़ मटक्यात जिंकणारे आणि अन् हरणारे नंतर ‘देशीप्रेमा’च्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा करीत असल्याचेही दिसत आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात खुलेआम मटका सुरु राहण्यास पोलिस प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे़ गत पंधरा वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आकड्यांचा हा खेळ सुरु आहे़ लोहा पोलिसांत तब्बल सहा अधिकारी कर्तव्यावर असतानादेखील मटका मात्र दिवसेंदिवस बहरतच चालला आहे़ मटका घेण्यासाठी शहरात तब्बल एक हजारांवर बुकी असल्याची माहिती हाती आली आहे़ तर लोहा ठाण्यासमोरील एका दुकानात मटक्याचा अड्डा धुमधडाक्यात सुरु आहे़ आकड्यांच्या या खेळामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत़ परंतु कल्याण-मिलनच्या या खेळात मटका बुकी आणि पोलिसांची मात्र चांदी होत असल्याचे दिसत आहे़ याबाबत आता जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच लक्ष घालण्याची मागणी लोहावासियांनी केली आहे़ दुपारी एक वाजेपासून सुरु होणारा हा आकड्यांचा खेळ रात्री सव्वाबारा वाजेपर्यंत सुरु राहतो़ मॉर्निंग डे ते बॉम्बे या मटक्याच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये ओपन आणि क्लोज या आकड्यांचेच खेळ असतात़ त्याच्या विळख्यात तरुणाई दिवसेंदिवस अडकत चालली आहे़मटक्याचे आकडे येण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे- मॉर्निंग डे- १ वा़ओपन, २ वाक़्लोज, मिलन डे- ३ वा़ओपन, कल्याण- ४ वा़ओपन, मिलन-५ वाक़्लोज, कल्याण-६ वाक़्लोज, नाईट मिलन-९वा़ओपन, बॉम्बे ओपन-९़३० मिनिटांनी, मिलन- ११ वा़२० मिनिटांनी क्लोज व शेवटी बॉम्बे क्लोजचा आकडा हा रात्री १२ वा़१० मिनिटांनी येतो़ दुपारपासून सुरु असलेला हा आकड्यांचा खेळ सर्वत्र एकसारखाच असतो़ मटका घेणाऱ्या बुकीला या ठरावीक वेळेला नेमका कोणता आकडा आला याची माहिती दिली जाते़ त्यानंतर कर्नोपकर्नी ती सर्वापर्यंत पोहोचविली जाते़ अवैध इमानदारीच्या या खेळात मात्र एकमेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार सहसा पहावयास मिळत नाही़