शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

माणुसकी जैन धर्माकडून शिकावी...

By admin | Updated: April 17, 2016 01:35 IST

औरंगाबाद : भगवान महावीर जयंतीमधील खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्त भागात पाणी, चारा वाटप आणि चारा छावण्या उभारून सकल जैन समाजाने मानवधर्म मोठा असल्याचे दाखवून दिले आहे.

औरंगाबाद : भगवान महावीर जयंतीमधील खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्त भागात पाणी, चारा वाटप आणि चारा छावण्या उभारून सकल जैन समाजाने मानवधर्म मोठा असल्याचे दाखवून दिले आहे. माणुसकी काय असते हे जैन धर्मीयांकडून शिकावे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे काढले. महानगरपालिकेच्या वतीने महावीर चौक येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘महावीर कीर्ती स्तंभा’चे लोकार्पण शनिवारी सकाळी रामदास कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, महापौर त्र्यंबक तुपे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, रेणुकादास वैद्य, विरोधी पक्षनेते अज्जू पहिलवान, नगरसेवक गजानन बारवाल, राखी देसरडा, कीर्ती शिंदे, रेशमा कुरेशी, सुनीता अहुलवार, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर रामदास कदम यांनी महावीर कीर्ती स्तंभावर पुष्पवृष्टी करून स्तंभाचे लोकार्पण केले. रामदास कदम पुढे म्हणाले की, महावीर चौकात उड्डाणपूल उभारताना ‘महावीर स्तंभ’ अन्यत्र हलविण्यात येणार होता तेव्हा जैन समाजातून तीव्र भावना व्यक्त होत असल्याचे मला कळाले. महावीर स्तंभ तेथेच राहावा यासाठी मी पुढाकार घेतला. त्यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकारी, समाजबांधवांनी सामंजस्याची भूमिका घेतली व संयम दाखविला हे वाखाणण्याजोगे होय. या सामंजस्यातूनच आज सुंदर महावीर कीर्ती स्तंभ उभा राहिला आहे. आपल्या मानवतावादी कार्याने जैन समाजाने अन्य समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. शहरवासीयांना अभिमान वाटावा अशा महावीर कीर्ती स्तंभाचे नूतनीकरण करण्यात आल्याचे आ. अतुल सावे यांनी सांगितले. शहराच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान असल्याचे आ. संजय शिरसाट म्हणाले. प्रारंभी, प्रास्ताविक प्रशांत देसरडा यांनी केले. शहरातील सकल जैन समाज एकजूट असल्याचे सांगत माजी महापौर विकास जैन यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी यांनी केले. सकल जैन समाजाचे कोषाध्यक्ष जी.एम. बोथरा, उपाध्यक्ष ललित पाटणी, चांदमल सुराणा, डॉ. शांतीलाल संचेती, प्रकाश बाफना, रतिलाल मुगदिया, विलास साहुजी, जिनदास मोगले, रवी मुगदिया, संजय संचेती, अशोक अजमेरा, विकास रायमाने, रमण साहुजी, शांतीनाथ गोसावी जन्मकल्याणक समितीचे वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, मिठालाल कांकरिया, भारती बागरेचा आदी पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी न्या. कैलासचंद चांदीवाल, अखिल मारवाडी महासभेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरख, महोत्सव समितीचे संतोष पापडीवाल, नीलेश सावलकर, नीलेश पहाडे, संजय सुराणा, सुनील वायकोस, सकल जैन समाजाचे माणिक गंगवाल, एम.आर. बडजाते, ताराचंद बाफना, डॉ. सन्मती ठोळे, डॉ. रमेश बडजाते, नरेंद्र गेल्डा, विजयराज संघवी, चांदमल सुराणा, राजेंद्र सेठिया, सोहनराज धोका, राजेंद्र डोसी, सुरेश सेठी, जितो ग्रुपचे सुभाष नाहर, गौतम संचेती, वाळूज येथील जि.प. सदस्य अनिल चोरडिया तसेच हडको जैन मंदिर येथील विलास जोगी, दिगंबर क्षीरसागर, प्रभाकर कुंटे, बाहुबली वायकोस, जैन इंजिनिअरिंगचे नितीन बोरा, राजेश पाटणी, गुरू परिवारचे अमोल पाटणी, अनुज दगडा तसेच विलास पाटणी, प्रकाश मुगदिया, पंकज फुलपगर, भरत ठोळे, हितेश कांकरिया, रोहित छाजेड, अजिंक्य संघवी, नीलेश सेठी, सुनील सेठी, नीलेश पहाडे, कुंतीलाल हिरण, स्वप्नील पारख, महेंद्र बंब, विशाल कांकरिया, राजेश मुथा, राजेश जैन, मनोज बोरा, सुभाष देसरडा, पारस ओसवाल, राजेश पगारिया, दिलीप खिंवसरा, डॉ. तातेड, भरत ठोले, अशोक गंगवाल, प्रमोद पांडे, विनोद लोहाडे, रवी लोढा तसेच करुणा साहुजी, भावना सेठिया, मंगल पारख, कविता अजमेरा, मंगला गोसावी, मंदा वायकोस, मधू जैन, कमलाबाई ओसवाल, सुषमा साहुजी, नंदा साहुजी, निमा पापडीवाल, मंजू पाटणी, सीमा पाटणी, नीता ठोले, नंदा मुथा, नीता संचेती, पुष्पा बाफना, अल्पा जैन, मेघा सुगंधी, प्रीती सेठी यांच्यासह सकल जैन समाज बांधवांची उपस्थिती होती. 1 महावीर कीर्ती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री रामदास कदम वेळेच्या अगोदर आले व सकाळी ८.३० वाजता त्यांनी महावीर स्तंभाचे लोकार्पण केले. कदम हे आज प्रचंड मूडमध्ये होते. त्यांनी आपल्या भाषणात चौकार, षटकार मारीत चौफेर फटके बाजी केली. मित्र पक्षाचे चिमटे काढले अन् सर्वांना पोटधरून हसविले. 2 कदम म्हणाले की, आपण कार्यक्रमात वेळेच्या अगोदर आलात असे उद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढताच मी त्यांना म्हणालो की, जनता लोकप्रतिनिधी निवडून देतात. निवडून आल्यानंतर जनतेला त्यांची वाट पाहावी लागू नये, या मताचा मी आहे. (हंशा), त्यामुळे मी ८.३० वाजेच्या कार्यक्रमाला १५ मिनिटे लवकर आलो. लोकांचा वेळ वाया घालविला नाही. (हंशा)3 आ.अतुल सावे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करीत श्रीक्षेत्र मांगीतुंगीसाठी आम्ही कसे सहकार्य केले हे सांगितले. रामदास कदम यांनी नंतर आपल्या भाषणात याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, आ.सावेजी तुम्ही विसरलात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्रात सत्ता आणण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. आपण दोघे भाऊ-भाऊ आहोत. (हशा) प्रत्येक वेळी कावीळ झाल्यासारखे का गडकरी, मुंडे यांचे नाव घेता (हंशा), सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांनीच आदेश दिले, हे का तुम्ही विसरता. (हशा)4 कदम म्हणाले की, राजेंद्र दर्डा माझे भाऊ आहेत. त्यांच्याविषयी आपुलकी, जिव्हाळा खूप आहे. हनुमानाने छाती फाडून हृदयातील श्रीराम दाखविले होते. मात्र, मी हनुमान नसून ‘रामदास’ असल्याने मी तसे दाखवू शकत नाही. (हशा).