शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: June 21, 2014 00:54 IST

येरमाळा/पेठसांगवी : गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर केले.

येरमाळा/पेठसांगवी : गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर केले. त्यानुसार मदतीची रक्कमही प्राप्त झाली. मात्र अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत नाहीत. नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. येरमाळा परिसरातील ५० वर शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. तर पेठसांगवी येथील शेतकऱ्यांनी तलाठ्याला धारेवर धरले. शेतावर न जाता पंचनामे ?येरमाळा : परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला होता. यामध्ये फळबागांसोबतच रबीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शासनाने पंचनामा करण्याचे निर्देश महसूल आणि कृषी विभागाला दिले होते. मात्र पंचनामे करताना संबंधित कर्मचारी शेतावर गेले नाहीत, असा आरोप वंचित शेतकऱ्यांकडून होवू लागला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेकडो शेतकऱ्यांना नुकसान होवूनही अनुदान मिळालेले नाही. बागायती पिकांचा यात समावेश न केल्याने परिसरातील केळी उत्पादक अडचणीत आले आहेत, असे वैजिनाथ बारकूल, आशाबाई विधाते आणि विजय देशमुख म्हणाले. पंचनामा हा प्रत्यक्ष शेतावर न जाता कार्यालयात बसून केला, असा आरोपही संबंधित शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अनेक शेतकरी जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. अशा काही शेतकऱ्यांना क्षेत्राच्या प्रमाणात अनुदान मिळाले. मात्र दुसरीकडे काही शेतकऱ्यांच्या हातावर नाममात्र रक्कम ठेवण्यात आली, असे अमोल पाटील म्हणाले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर धनंजय बारकूल, नितीन कवडे, सुधाकर विधाते, अमोल पाटील, उमेश बारकूल आदींच्या सह्या आहेत.३०० लाभार्थ्यांच्या मदतीकडे डोळेपेठसांगवी : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी परिसरात मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. आजही तब्बल ३०० शेतकरी अनुदानाच्या रक्कमेकडे डोळे लावून आहेत.नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर अनुदानाच्या रक्कमा शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्या आहेत. यातील काही शेतकऱ्यांना ९ हजार तर काहींना ४ हजाराप्रमाणे अनुदानाच्या रक्कमा वितरित करण्यात येत आहेत. जवळपास ८२६ शेतकऱ्यांना ३६ लाख ८४ हजार रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली. मात्र ३०० वर शेतकऱ्यांना एक छदामही मिळालेला नाही. त्यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्याला जाब विचारला. महसूलच्या कर्मचाऱ्यांनी तोंडे पाहून लाभार्थ्यांची निवड केली, असा आरोप होत आहे. काही शेतकऱ्यांनी तर तलाठ्याला घेरावही घातला. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी सोसायटीचे चेअरमन गणेश पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)