औरंगाबाद : शहरात महिनाभरानंतर पुन्हा एकदा थंडीत वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण आणि दिवसभर वाहणाºया गार वाºयाने चांगलाच गारठा निर्माण झाल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली.शहरात २९ डिसेंबर रोजी औरंगाबादेत थंडीचा रेकॉर्ड ब्रेक झाला होता. शहराचे तापमान ५.८ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले आणि तापमानाने मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडले. यानंतर तापमानात काही प्रमाणात वाढ होत गेली. नव्या वर्षाच्या प्रारंभी थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येत होता; परंतु दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढला.शहरात दोन दिवसांपासून ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. शहरात रविवारी चांगलीच थंडी जाणवली. दिवसभर गार वारे वाहत होते. थंडीमुळे दुपारी १२ वाजताही थंडीचा परिणाम जाणवत होता. शहरातील विविध भागांमध्ये नागरिक दुपारच्या वेळी उन्हात उभे असल्याचे पाहायला मिळाले. तापमानात घट झाल्याने शहर परिसरात पुन्हा शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळाले. चिकलठाणा वेधशाळेत रविवारी कमाल तापमान २६.२ अंश, तर किमान तापमान १३.० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.विदर्भातील अवकाळी पाऊस आणि जम्मू-काश्मीर येथील बर्फवृष्टीमुळे वातावरणात बदल झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेतर्फे देण्यात आली. पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाºया वाºयांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे विदर्भात अवक ाळी पाऊस बरसला. औरंगाबादेतही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती.
शहराला भरली हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:28 IST
औरंगाबाद : शहरात महिनाभरानंतर पुन्हा एकदा थंडीत वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण आणि दिवसभर वाहणाºया गार वाºयाने चांगलाच गारठा ...
शहराला भरली हुडहुडी
ठळक मुद्देतापमान १३ अंशांखाली : गार वाऱ्याने वातावरणात गारठातापमान १३ अंशांखाली : गार वाऱ्याने वातावरणात गारठा