शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

बॉलीवूडमधील हृतिकचा पुतळा नागेश्वरवाडीत

By admin | Updated: August 31, 2014 00:42 IST

औरंगाबाद : बॉलीवूडच्या बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणारा ‘क्रिश-३’ या चित्रपटासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुपरहीरो हृतिक रोशनचा पुतळा शहरातील नागेश्वरवाडीत सर्वांना पाहावयास मिळत आहे.

औरंगाबाद : बॉलीवूडच्या बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणारा ‘क्रिश-३’ या चित्रपटासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुपरहीरो हृतिक रोशनचा पुतळा शहरातील नागेश्वरवाडीत सर्वांना पाहावयास मिळत आहे. हे वाचून आश्चर्य वाटले असेल; पण येथील नागेश्वर गणेश मंडळाने थेट बॉलीवूडमधील हा पुतळा शहरात आणून सर्वांना चकित केले आहे. ‘क्रिश-३’ चित्रपटात सुपरहीरोची भूमिका साकारणाऱ्या हृतिक रोशनचा २७ फुटांचा पुतळा तयार करण्यात आला होता. ‘गॉड अल्लाह और भगवान सबने बनाया इक इन्सान’ या गाण्यात हा पुतळा सर्वांनी पाहिला आहे.रुपेरी पडद्यावर पाहिलेला हा भव्य पुतळा हृतिकच्या चाहत्यांना प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहे. नागेश्वर गणेश मंडळाने नागेश्वरवाडीच्या चौकात हा पुतळा उभारला आहे. यासंदर्भात मंडळाचे पदाधिकारी मनीष देशपांडे यांनी सांगितले की, आमच्याच मंडळातील बालपणीचा मित्र आता बॉलीवूडमध्ये आर्ट डायरेक्टर असलेला सुनील जैस्वाल याने ‘क्रिश-३’साठी हा पुतळा तयार केला होता. तोच पुतळा येथे आणण्यात आला आहे. २७ फुटांचा हा पुतळा संपूर्ण फायबरने बनवलेला आहे. मागील २७ वर्षांपासून मंडळ कार्यरत असून, दोन वर्षांपूर्वी ‘अग्निपथ’ चित्रपटासाठी वापरण्यात आलेली अष्टभुजा असलेली गणपतीची भव्यमूर्ती गणेशोत्सवात आणण्यात आली होती. तसेच मागील वर्षी गणेशोत्सवात हिंदी चित्रपटात दाखविण्यात येणारी मंदिराची प्रतिकृतीही येथे उभारण्यात आली होती. हृतिक रोशनचा हा भव्य पुतळा त्याच्या चाहत्यांसाठी गणेशोत्सवाची आगळीवेगळी भेटच ठरत आहे. तरुण असो वा तरुणी सर्व जण या पुतळ्याची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत आहेत. बच्चेकंपनीही हा भव्य पुतळा पाहून खुश होत आहे.