शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृषिकेश मोटकरच्या शतकी खेळीने महाराष्ट्राची गोवा संघाविरुद्ध स्थिती भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:06 IST

पुणे येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत हृषिकेश मोटकरच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेत आपली स्थिती भक्कम केली आहे.

कुचबिहार करंडक : पहिल्या डावात १०७ धावांची आघाडीऔरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत हृषिकेश मोटकरच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेत आपली स्थिती भक्कम केली आहे. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर गोवा संघाने दुसºया डावात ५ बाद १६१ धावा केल्या आहेत. दिवसअखेर दिगेश रायकर १५ व सईश कामत २३ धावांवर खेळत आहेत. त्यांच्याकडून आलम खानने सर्वाधिक ९६ चेंडूंत ४ चौकार, २ षटकारांसह ३७, मंथन कुथकरने ३२, यश परबने २२ व राहुल मेहताने २५ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरघंटे आणि यतीन मंगवाणी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.त्याआधी कालच्या ५ बाद २४८ या धावसंख्येवरून पुढे खेळताना महाराष्ट्राने सर्वबाद ३२२ धावा केल्या. महाराष्ट्राकडून हृषिकेश मोटकर याने २५१ चेंडूंत १६ चौकारांसह १२७ धावांची भागीदारी केली. हृषिकेश मोटकर याने स्वप्नील फुलपगर याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्वप्नील फुलपगरने ५५ चेंडूंत ८ चौकारांसह ४७, सिद्धेश वरघंटे याने ३३ धावांचे योगदान दिले. गोवा संघाकडून हेरंब परबने ७५ धावांत ३ गडी बाद केले. ऋत्विक नाईक व बलप्रीतसिंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. गोवा संघाने पहिल्या डावात २१५ धावा केल्या होत्या.संक्षिप्त धावफलक : गोवा (पहिला डाव) : २१५. दुसरा डाव : ६७ षटकांत ५ बाद १६१. (आलम खान ३७, मंथन कुथकर ३२. सिद्धेश वरघंटे २/४९, यतीन मंगवाणी २/२४).महाराष्ट्र : पहिला डाव : ८८ षटकांत सर्वबाद ३२२. (हृषिकेश मोटकर १२७, स्वप्नील फुलपगर ४७. हेरंब परब ३/७५).