प्रतिक्रिया
३० वर्षे विनाअपघात बस चालविली
एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरी करताना काय कमविले तर ते मागील ३० वर्षांत विनाअपघात बस चालविली, लाखो प्रवाशांना सुखरूप प्रवास घडविला, ही माझी कमाई आहे.
सखाहरी सोमासे
निवृत्त, एसटी बसचालक
---
४० ते ४५ च्या स्पीडने बस चालवतो
ताशी ७० किमीच्या स्पीडने बस चालविण्याची मर्यादा आहे; पण मी ४० ते ४५ च्या स्पीडने बस चालवितो, यामुळे मागील ३० वर्षांत एकही अपघात माझ्या हातून घडला नाही.
रफिक पटेल
एसटी बसचालक
---
सुरक्षित प्रवास नैतिक जबाबदारी
परिवहन महामंडळात सर्व बसचालक प्रशिक्षण घेतलेले आहेत. सुरक्षित प्रवासही आमची नैतिक जबाबदारी आहे. डेपो क्रमांक २ मध्ये मागील वर्षात १७ बसचा अपघात झाला. त्यातील ९ अपघात किरकोळ होते. ६ अपघात गंभीर तर २ अपघातात २ जण मृत्यू पावले. आमच्याकडे ३० वर्षे विनाअपघात बस चालविणारे चालक आहेत.
सुनील शिंदे
आगारप्रमुख, आगारक्रमांक २
----
मागील २०२० या वर्षात झालेले एसटीचे अपघात
महिना अपघातांची संख्या
जानेवारी ---- १४
फेब्रुवारी ०४
मार्च ०३
एप्रिल ००
मे ००
जून ०१
जुलै ००
ऑगस्ट ०१
सप्टेंबर ०६
ऑक्टोबर ०३
नोव्हेंबर ०७
डिसेंबर ०७
-----
मागील वर्षात ४६ अपघात घडले. त्यातील २५ अपघात किरकोळ होते. १४ गंभीर अपघात तर ७ अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. २२ मार्च ते २० ऑगस्टदरम्यान लॉकडाऊनमुळे एसटी बससेवा बंद होती. मात्र, या काळात कोविड रुग्णाची ने - आण करण्यासाठी तसेच मजुरांना त्यांच्या गावाकडे सोडविण्यासाठी काही बस सेवेत होत्या.