मुलांची शाळा कशी निवडायची इथपासून ते शाळेसंबंधी असणाऱ्या विविध प्रश्नांबद्दल या वेबिनारद्वारे सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या वेबिनारमध्ये गुरूकूल ऑलिम्पियाड स्कूलचे संचालक डॉ. सतीश तांबट पालकांशी संवाद साधतील. या वेबिनारमध्ये चर्चिले जाणारे काही विशेष मुद्दे-
१. कोणते बोर्ड निवडायचे ?- सध्या स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई, आयबी असे अनेक बोर्ड उपलब्ध आहेत. प्रत्येक बोर्डाच्या अनेक शाळा पालकांच्या अवतीभोवती आहेत. भविष्यातील कोणकोणत्या बाबींचा विचार करून बोर्ड निवडायचे, शाळेचा विचार करताना मुलांच्या दृष्टीने तिथे उपलब्ध असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने तपासून पाहाव्यात, यासारख्या अनेक बाबींविषयी डॉ. तांबट मार्गदर्शन करतील.
२. स्पर्धा परीक्षेचे महत्त्व आणि समग्र मार्गदर्शन-
डॉ. होमी भाभा, एनटीएसई यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षा आज शालेय स्तरावर घेतल्या जातात. या परीक्षा म्हणजे भविष्यातील करिअरच्या विविध टप्प्यांवरील स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. म्हणूनच या स्पर्धा परीक्षा आणि त्याविषयीचे समग्र मार्गदर्शन कसे असावे, याविषयी वेबिनारद्वारे माहिती मिळेल.
३. कोटा एक्सपर्टद्वारे फाउंडेशन कोर्स-
१०वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी कोटा येथे पुढील शिक्षणासाठी जातात. पण तिथल्या दर्जाचे शिक्षण औरंगाबादमध्येच फाउंडेशन कोर्सद्वारे कशा पद्धतीने मिळू शकते, याविषयी डॉ. तांबट संवाद साधतील.
४. नवे शैक्षणिक धोरण-
नवे शैक्षणिक धोरण आणि त्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रात होणारे बदल याविषयी पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. म्हणूनच डॉ. तांबट शैक्षणिक धोरणाविषयीही पालकांना मार्गदर्शन करतील.
चौकट :
- अधिक माहिती आणि संपर्कासाठी ९९२११७८८३० किंवा ९६७३५९५५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी http://bit.ly/GurukulAbad या लिंकवर क्लिक करावे.
चौकट :
गुरूकूल ऑलिम्पियाड स्कूलचे संचालक डॉ. सतीश तांबट हे मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणतज्ज्ञ अशी ओळख असलेले डॉ. तांबट करिअर समुपदेशक म्हणूनही ओळखले जातात. मुलांचा कोणत्या क्षेत्राकडे कल आहे, त्यांचा आयक्यू, ईक्यू कसा आहे, हे जाणून घेऊन डॉ. तांबट योग्य करिअरची निवड कशी करावी, याविषयीही मार्गदर्शन करतात.
सूचना
कॅम्पस क्लब व गुरूकूल ऑलिम्पियाड स्कूलचा लोगो घेणे