शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गृहनिर्माण संस्थेची होणार चौकशी

By admin | Updated: May 23, 2017 00:14 IST

जालना : गटविमा गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे बांधून देण्याचे आश्वासन देत अनेकांची फसवणूक करणाऱ्या उमंग सहकारी गृहनिर्माण संस्थेची चौकशी करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गटविमा गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे बांधून देण्याचे आश्वासन देत अनेकांची फसवणूक करणाऱ्या उमंग सहकारी गृहनिर्माण संस्थेची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान,कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण मागे घ्यावे, असे पत्र सहाय्यक निबंधकांनी सोमवारी उपोषणकर्त्यांना दिले.साखळी उपोषण करणाऱ्या फकिरा साळुबा वाघ यांच्यासह फसवणूक झालेल्या इतर सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. साहाय्यक निबंधकांनी संस्थेच्या नोंदणीकृत पत्यावर भेट दिली असता, कार्यालय आढळून आले नाही. संस्थेचे अध्यक्ष व सचिवांबाबत काहीच माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे उपोषणकर्त्यांनी वेळावेळी याबाबत पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झाला नाही.सहाय्यक निबंधकांनी उमंग सहकारी गृहनिर्माण संस्था इंदेवाडी या संस्थेचे रेकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांकडे पत्रव्यहार केला आहे.सर्व माहिती उपलब्ध होताच संस्थेवर कारवाई केली जाईल. त्यामुळे कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण मागे घ्यावे, असे साहाय्यक निबंधकांनी साखळी उपोषण कर्त्यांना लेखी कळविले आहे.