शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘लग्ननाट्या’च्या बेडीनंतर नववधूला हातकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 00:13 IST

औरंगाबाद : लग्नाच्या आठव्या दिवशीच रोख ३५ हजार रुपये आणि ४ लाख १० हजारांच्या दागिन्यांसह पळून गेलेल्या नववधूला साथीदारासह वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : लग्नाच्या आठव्या दिवशीच रोख ३५ हजार रुपये आणि ४ लाख १० हजारांच्या दागिन्यांसह पळून गेलेल्या नववधूला साथीदारासह वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. शोभा ऊर्फ सुनीता राजू कुलथे (४०, रा. रांजणगाव शेणपुंजी, मूळ रा. पूर्णा, जि. परभणी) आणि तिचा साथीदार युनूस वजीर शेख (रा. कमळापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त लष्करी अधिकारी शिवानंदन सत्यन यांनी ३ मे रोजी ४० वर्षांवरील एक जीवनसाथी पाहिजे, अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. या जाहिरातीच्या आधारे सुमारे ३५ महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यापैकी शोभा ऊर्फ सुनीता ही आपणास पसंत असल्याचे शिवानंदन यांनी तिचा मानलेला भाऊ शेख सलमान ऊर्फ शेख युनूस यास कळविले होते. त्यानंतर ८ मे रोजी त्यांनी वरद गणेश मंदिर येथे हिंदू पद्धतीने विवाह केला. या विवाहप्रसंगी शिवानंदन यांनी पत्नी सुनीता हिच्या गळ्यात तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र घातले होते. पाच दिवसांनी सुनीता हिने संधी साधून साथीदाराच्या मदतीने शिवानंदन यांच्या घरातील ४ लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख ३५ हजार रुपये घेऊन पोबारा केला. शिवानंदन यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचे मोबाईलही बंद होते. शिवानंदन यांनी क्रांतीचौक ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मोबाईलवरून ठावठिकाणा शोधून गुरुवारी रात्री एमआयडीसी वाळूज परिसरात सापळा रचून जेरबंद केल्याचे पोहेकॉ गोपाल सोनवणे यांनी सांगितले.श्रीमंत होण्याचा शॉर्टकट जेलमध्ये...आरोपी सुनीता हिचा पती दारू प्राशन करून सतत त्रास देत होता, त्यामुळे तिने त्यास सोडले. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे.रांजणगाव येथे घर भाड्याने घेऊन राहत असताना धुणी, भांडी करून घर चालविताना तिच्या नाकीनऊ येत आहे. अशातच तिची ओळख शेख युनूससोबत झाली. वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून सुखी जीवन जगण्यासाठी संधी चालून आल्याचे वाटले आणि शेख युनूसच्या मदतीने ती शिवानंदन यांच्याशी संपर्क साधून लग्न केले.मात्र, पैसे कमविण्याचा कोणताही शॉर्टकट मार्ग कारागृहात नेणारा असल्याचे समजल्याने आता तिला पश्चात्ताप होत आहे. आज तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावल्याचे पोहेकॉ. सोनवणे यांनी सांगितले.