शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

घरकुलांची कामे रखडली

By admin | Updated: June 24, 2014 00:41 IST

प्रदीपकुमार कांबळे, लोहा शासनामार्फत आर्थिकदृष्ट्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दारिद्रय रेषा कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येते़

प्रदीपकुमार कांबळे, लोहाशासनामार्फत आर्थिकदृष्ट्या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दारिद्रय रेषा कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधणीसाठी अर्थसहाय्य करण्यात येते़ सन २०११ ते २०१४ या कालावधीदरम्यान एकूण १ हजार २३२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली़ मात्र प्रत्यक्षात केवळ ६३३ घरकुलांची कामे पूर्ण झाली व उर्वरित ५९९ घरकुलांचे काम प्रशासनातील जबाबदार अभियंता-अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडले असल्याची बाब समोर आली आहे़ ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेली पंचायत समिती सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असते़ त्याच या बाबीकडे सभापतीचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ लोहा तालुक्यातील १२६ गावांतील विकास पं़स़ अंतर्गत विविध योजनेअंतर्गत करण्यात येतो़ शासनाकडून गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी उदात्त भावनेतून पुढे आलेली इंदिरा आवास योजना कार्यान्वित आहे़ सन २०११-१२ या कालावधीदरम्यान ४५४ घरकूल मंजूर करण्यात आले़ पैकी १८७ पूर्ण तर २६७ घरकूल अपूर्ण राहिले़ सन २०१२-१३ या कालावधीत ६३५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली़ त्यात ३३१ घरकुल पूर्ण झाले़ तर ३०४ अपूर्ण राहिले व सन २०१३-१४ मध्ये एकूण १४३ घरकुल मंजूर झाले़ पैकी ८१ घरकुल पूर्ण तर ६२ अपूर्ण राहिले़सन २०११-१२ व २०१२-१३ या कालावधीदरम्यान घरकुल बांधण्यासाठी ६८ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येत होते़ तर सन २०१३-१४ या कालावधीत ९५ हजार रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले़ सन २०११-१२ मध्ये अपूर्ण घरकुलांचे गाव व संख्या पुढीलप्रमाणे- सुनेगाव-६, ढाकणी-११, बेरळी-११, दगडगाव-१६, जोशीसांगवी-१७, बोरगाव (कि़)-१५, कापशी खु़-११, सुगाव-१९, माळेगाव (या़)-८, हातणी-६, चितळी-२, बोरगाव-१, आंबेसांगवी-२, वाळकी (खु़)-७, खांबेगाव-३, नांदगाव-८, पांगरी-८, वाळकी (बु़)-२, कदमाचीवाडी-१, पळश्ी-४, येळी-१, रायवाडी-२, शेवडी बा़-१६, कलंबर-१२, हरबळ-१, धनज(खु़)-२, बोरगाव-१़ सन २०१२-१३ कालावधीत अपूर्ण घरकूल- हिंदोळा-१०, बामणी-१, पिंपळदरी-४, लांडगेवाडी-३, लिंबोटी-११, कलंबर खु-४, देवलातांडा-१०, हिराबोरीतांडा-७, धानोरा(शे़)-१०, दगडगाव-१०, कापशी (खु़)-१६, नगारवाडी-८, अंतेश्वर-१५, निळा-१२, पोखरी-३, हरणवाडी-पूर्ण अपूर्ण १९, वागदरवाडी-४, पिंपळगाव (ए़)- पूर्ण १, सोनखेड-३०, डेरला-१२, डोलारा-१८, टाकळगाव-९, खडकमांजरी-१५, ढाकणी-५, जानापुरी-११, सुगाव-१६, घुगेवाडी-१३, हरसद-७, कापशी-२३, कामळज-५, मारतळा- पूर्ण २३ अपूर्ण, धनज (बु़)-१९,जवळा-पूर्ण २३, चितळी १३, डोणवाडा-१़सन २०१३-१४ कालावधीतील अपूर्ण घरकूल- डोणवाडा-१९, धनज-१३, पोखरभोसी-२०, रिसनगाव-१६, गोळेगाव- पूर्ण, लव्हराळ १३, भारसावडा - पूर्ण ६ अपूर्ण़ ग्रामीण भागातून लाभार्थी पैसे खर्च करून पं़स़मध्ये अनेकवेळा चकरा मारून देखील त्या लाभार्थ्यांची दखल घेण्याची तसदी अधिकारी किंवा कर्मचारी घेत नाहीत़ तुटपूंज्या अनुदानावर लाभार्थी घरकूल पूर्ण करतो़ परंतु कागदपत्राच्या भानगडीत त्यास कर्मचाऱ्यांकडून अडकवून त्याचे काम करण्यास टाळाटाळ करण्यात येते़ पं़स़चे गटविकास अधिकारी मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून ये-जा करत असल्यामुळे त्यांना या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही़ त्याचा फायदा घेत कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत सर्वसामान्यांना वेठीस धरतात़ गटविकास अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे फावते़ मात्र सर्वसामान्यांची फरफट होत आहे़ वरिष्ठांनी गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे़गत तीन वर्षांपासून रखडलेली घरकुलाचे कामे पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांनी सूचना दिल्या असून अभियंता व कर्मचाऱ्यांकडून कागदोपत्राची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करण्यात येवून अपूर्ण घरकूल लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत - व्ही़एऩ रंगवाळ (गटविकास अधिकारी)लाभार्थ्यांची दयेयकेही अडकलीतालुक्यातील ५९९ अपूर्ण घरकूल संख्या असल्याची माहिती पं़स़तून देण्यात आली़ तीन-तीन वर्षापासून घरकुलाचे काम अपूर्ण असल्याचे सांगून लाभार्थ्यांना बील अदा करण्यात आली नाहीत़ वास्तविकता घरकूल काम पूर्ण होण्यासाठी लाभार्थ्यास घरकुलासह शौचालय बांधणे गरजेचे असल्यामुळे लाभार्थ्यांना अनुदानाचा श्ेवटचा हप्ता देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले़ मात्र लाभार्थ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय कामाचे बील अदा केले जात नसल्याचे लाभार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़