शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

तासाभराचा विलंब ठरू शकतो जीवघेणा

By admin | Updated: September 23, 2014 23:22 IST

हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे.

हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे. परिणामी, मागील चार वर्षांत ग्रामीण भागात दुपटीने तर शहरी भागात सहा पटीने रूग्ण वाढले. विशेषत: लक्षणाविना अचानक आणि अनपेक्षितपणे आलेल्या झटक्यानंतरच हा आजार उद्भवल्याचे समजते. तद्नंतर तासाभरात जर रुग्णालय जवळ केले नाही तर प्राणास मुकावे लागते. आरोग्याच्या समस्येविना माणूस सापडणे दुर्मिळच. दिवसेंदिवस नवनवे आजार समोर येताना दिसतात. गंभीर आणि दुर्धर आजारांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली. काही आजार सांगून येतात तर काही आजारांना स्वत:हून आमंत्रण देतो. दोन्हीपेक्षा वेगळा असलेल्या हृदयरोगाचे वैैशिष्ट हे अनपेक्षितपणा आहे; परंतु त्यासाठी मानवाची बदलती जीवनशैैली कारणीभूत ठरते. दिनक्रमातील गतिमानता काहीअंशी या आजाराकडे घेऊन जाते. त्याहीपेक्षा तानतणावाचा परिणाम आजारांना निमंत्रण देणारा ठरतो. तत्क्षणी आरोग्याचा निष्काळजीपणा अधिक भोवण्याची शक्याता असते. प्रामुख्याने हृदयास होणाऱ्या अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे तो उद्भवतो. हृदयातील रक्तवाहिन्यांत चरबीचा साठा होऊन त्याची पोकळी निर्माण होते. परिणामी, रक्तपुरवठा बंद पडल्याने झटका यतो. पुरूषांमध्ये ४५ तर स्त्रियांमध्ये ५५ वर्षांपेक्षा जास्त व्यक्तांनी अधिक धोका संभवतो. आजघडीला या आजारालाही वय राहिले नाही. घरातील व्यक्तींना व जवळच्या नातेवाईकांना जर हृदयरोग असेल तर घरातील कोणालाही हा आजार होऊ शकतो. अचानक छातीत वेदना होतात. तत्क्षणी रूग्णास चालवू नये आणि तातडीने दवाखाना जवळ करावा. हिंगोलीतील सामान्य रूग्णालयात या रूग्णांसाठी कसलीही व्यवस्था नाही. स्वतंत्र विभाग तर लांबचीच बाब आहे. परिणामी, खाजगी रूग्णालयात का होईना तासाच्या आत रूग्णांना घेऊन जाणे अगत्याचे ठरते. अन्यथा अधिक विलंब रूग्णांचे प्राण घेऊ शकतो. हे आहेत उपायहा आजार होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करावा, रक्ताची तपासणी करावी, चाळीसीनंतर वर्षातून एकदा ईसीजी काढून खात्री करावी. उपचार घेणाऱ्या रूग्णांनी दररोज तासभर चालावे, फास्टफूड, मांस, तेलकट पदार्थ खाऊ नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याचा असल्ला डॉ. अगस्ती जवळेकर यांनी दिला. (वार्ताहर)