शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलचालकावर रोखले पिस्तूल; दोघे गजाआड

By admin | Updated: March 24, 2017 00:06 IST

बीड : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मालकाने बिलाची मागणी केली तेव्हा दोघांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली.

बीड : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मालकाने बिलाची मागणी केली तेव्हा दोघांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. हॉटेल मालकाच्या पत्नीलाही धमकावले. ही घटना बुधवारी रात्री शहरातील मित्रनगर भागातील आशीर्वाद हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अशोक शिराळेसह पाचजणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.किरण उत्तमराव उबाळे यांचे मित्रनगर भागात हॉटेल आहे. रात्री साडेआठ वाजता माजी नगरसेवक अशोक शिराळे, अमोल शिराळे, सतीश क्षीरसागर, रत्नदीप गोरे, अक्षय आठवले हे तेथे आले. त्यातील काहींनी चहा तर काहींनी थंडपेय घेतले. सिगारेट व अंडे खरेदी करुन ते पैसे न देताच बाहेर पडू लागले. याचवेळी हॉटेल मालक उबाळे यांनी त्यांना बिलाची मागणी केली. तेव्हा या सर्वांनी ‘तुझे कशाचे पैसे’ असे म्हणत थेट शिवीगाळ सुरु केली. रत्नदीप गोरे याने अंगाला मिठी मारून लाथाबुक्याने मारहाण केली तर अशोक शिराळे याने तोंडावर बुक्की मारून डोक्याला पिस्तूल लावत जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी अक्षय आठवले याने उबाळे यांच्या पत्नी छाया यांच्यासमोर जावून पिस्तूल दाखवत धमकावले. त्यानंतर दोघांनी हॉटेलच्या गल्ल्यातील चार हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले, असे उबाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पाच जणांविरूद्ध शिवाजीनगर ठाण्यात दरोडा व आर्म अ‍ॅक्टअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक सलीम पठाण करत आहेत. (प्रतिनिधी)