शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलचा वाढीव fsi रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:19 IST

सिडको एन-३ येथील एका सहामजली रुग्णालयास महापालिकेने नियम धाब्यावर बसवून बांधकाम परवानगी दिली होती. या बांधकाम परवानगीवर सिडकोचे मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांनी तीव्र नाराजी दर्शवीत महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिले होते. या पत्राला नगररचना विभागाने चक्क केराची टोपली दाखविली होती. यासंदर्भात बुधवारी ‘लोकमत’ने ‘मनपाने सिडकोला लावला ८० लाखांना चुना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एन-३ येथील एका सहामजली रुग्णालयास महापालिकेने नियम धाब्यावर बसवून बांधकाम परवानगी दिली होती. या बांधकाम परवानगीवर सिडकोचे मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांनी तीव्र नाराजी दर्शवीत महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिले होते. या पत्राला नगररचना विभागाने चक्क केराची टोपली दाखविली होती. यासंदर्भात बुधवारी ‘लोकमत’ने ‘मनपाने सिडकोला लावला ८० लाखांना चुना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे हादरलेल्या नगररचना अधिकाºयांनी सायंकाळी तातडीने रुग्णालयास दिलेला वाढीव एफएसआय त्वरित रद्द केला.सिडको-हडकोत कोठेही बांधकाम करायचे असल्यास अगोदर सिडको प्रशासनाची एनओसी घ्यावी लागते.सिडको एन-३ येथे भूखंड क्रमांक ३१५ वर भव्य रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिडको-हडकोत १ एफएसआय वापरण्याची मुभा आहे.रुग्णालयाचे बांधकाम करणाºया देवगिरी कन्स्ट्रक्शनचे संदीप मिठ्ठूशेठ सानप यांना सिडकोने १ एफएसआय वापरण्याची मुभा एनओसीमध्ये दिली. यापेक्षा अधिक एफएसआय हवा असल्यास त्याची वेगळी रक्कम भरावी, असे सांगण्यात आले. सानप यांनी सिडकोच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत बांधकाम परवानगीची फाईल महापालिकेत दाखल केली.मनपा अधिकाºयांनीही सर्व नियम धाब्यावर बसवत गुपचूप रुग्णालयास बांधकाम परवानगी देऊन टाकली. ज्या अधिकारी व कर्मचाºयांकडे सिडको एन-३ परिसर येत नाही, त्यांनी फाईलवर प्रस्ताव लिहिण्याचा प्रताप करून ठेवला आहे. कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सह्यासुद्धा करूनटाकल्या.मनपाच्या या कृतीमुळे सिडकोला तब्बल ८० लाख रुपयांचा चुना लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले. या वृत्तामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर या कक्षातून त्या कक्षात सैरावैरा पळत होते. सायंकाळी सानप यांना दिलेली वाढीव एफएसआयची परवानगी रद्द करण्यात आली.टीडीआर घोटाळ्यानंतरही....मागील वर्षी नगररचना विभागातील काही अधिकारी व कर्मचाºयांना तत्कालीन आयुक्तांनी थेट निलंबित केले होते. टी.डी.आर. प्रकरणांमध्ये अनेक घोटाळे या विभागाने करून ठेवले होते. दोषींवर थेट पोलिसांतही गुन्हे दाखल करण्याचे धाडस प्रशासनाने दाखविले होते. एवढे होऊनही या विभागाने कोणताच बोध घेतलेला नाही, हे विशेष.