शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

गारपीट अर्थसाहाय्याचे कन्नड तालुक्याला मिळाले १ कोटी ७० लाख

By admin | Updated: March 22, 2016 01:29 IST

कन्नड : जून २०१४ व एप्रिल २०१५ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य

कन्नड : जून २०१४ व एप्रिल २०१५ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी कन्नड तालुक्याला १ कोटी १७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तथापि शासकीय सुट्यांमुळे याद्या बनविण्याच्या कामास विलंब होत आहे.जून २०१४ मध्ये वादळी वारे व गारपिटीमुळे १६ गावांना तडाखा बसला होता. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार नेवपूर, रेऊळगाव व रोजवेपूर येथील १४ शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठी ४४ हजार १०० रुपये प्राप्त झाले आहेत, तर नागद, बेलखेडा, हरसवाडी, लोंजा, पांगरा, बोपेवाडी, सायगव्हाण, बोरमळीतांडा, नागदतांडा, नेवपूर, रेऊळगाव, रोजवेपूर, वडगाव (जा), बालखेडा व सोनवाडी गावातील ८७.८० हेक्टर वरील बाधित फळपिकांसाठी २०२ शेतकऱ्यांसाठी १० लक्ष २९ हजार ६०० रुपयांचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे.