शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उमरी तालुक्यात फळबागांचे नुकसान

By admin | Updated: March 1, 2016 23:54 IST

उमरी: तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ सोमवारी सायंकाळी सुरू झालेला वादळी वाऱ्यासह पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता़

उमरी: तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़सोमवारी सायंकाळी सुरू झालेला वादळी वाऱ्यासह पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता़ तालुक्यात उमरी स्थानिकला १२ मि़मी़, बोळेगाव ६ मि़मी़, सिंधी १८ मि़मी़ यानुसार सरासरी १२ मि़मी़ पाऊस तालुक्यात झाल्याची नोंद आहे़ वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे पडली़ तसेच शेतातील निवारा व झाडे उन्मळून गेली़ यातच बोळसा गं़प़ येथे एक म्हैस मरण पावली़ मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी घटनास्थळाची पंचनामा केला़ तहसीलदार दामोधर जाधव यांनी ही माहिती दिली़ तळेगाव येथे श्रीकांत देशमुख, गणेश जाधव, अफसर पटेल, किशनराव खदगाये, मनोज कुलकर्णी आदी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या बागेतील आंबा, मोसंबी, लिंबू आदी फळबागाचे मोठे नुकसान झाले़ आंब्याचा मोहोर तसेच फळे पूर्णत: नष्ट झाली़ लिंबू व मोसंबीच्या झाडाला तर एकही फळ राहिले नाही़ तालुक्यातील नागठाणा, सिंधी, शिरूर, करकाळा, बळेगाव, जामगाव आदी शिवारात फळबागा नष्ट झालया़ दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांनी कशीतरी फळबाग वाढविली़ तीही सोमवारच्या वादळी वाऱ्याने पूर्णत: नष्ट केली़ यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे़ शासनाने यासंदर्भात सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली़(वार्ताहर)