शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बागायती शेतीची नोंद कोरडवाहू; निषेधार्थ धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:30 IST

समृद्धी महामार्गात संपादित करण्यात येणा-या बागायती शेतीची नोंद सर्वेक्षणामध्ये कोरडवाहू करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गात संपादित करण्यात येणा-या बागायती शेतीची नोंद सर्वेक्षणामध्ये कोरडवाहू करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले व नंतर जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गासाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतजमिनी संपादित करण्यात येत असून, त्यासाठी केल्या जाणा-या सर्वेक्षणात ज्या शेतक-यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे, अशा शेतीची नोंद केवळ तीन वर्षांचा पेरा नाही या कारणास्तव कोरडवाहू अशी करण्यात येत आहे.ही बाब अन्यायकारक आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी बागायती शेती करू शकले नाहीत; परंतु त्या बागायती आहेतच. विहीर, पाइपलाइन यासाठी या शेतक-यांनी कर्जसुद्धा घेतलेले आहे.सलग तीन वर्षे बागायती केलेली असणे हा निकष न ठेवता वस्तुस्थितीवर आधारित ज्या शेतक-यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे, त्या बाबींची नोंद घेऊन या शेतीची बागायती अशी नोंद घेण्यात आली पाहिजे.या धरणे आंदोलनात घोडेगाव, गोळवाडी, दहेगाव, पालखेड, जांबरगाव या गावचे शेतकरी सहभागी झाले होते.विलास चव्हाण, शैलेश सुरासे, मयूर वेरुळकर, भाऊसाहेब राऊत, श्रीराम साळुंके, भाऊसाहेब शिंदे, आबासाहेब उगले, संताराम उगले, नानासाहेब रोठे, अद्दूसेठ बागवान, अण्णा उगले, नारायण उगले, कृष्णा पवार, दत्तात्रय पवार, पारसनाथ कोल्हे, नंदकुमार जाधव, योगेश उगले, सीताराम उगले, राजू शेळके, मधुकर सदावर्ते, नामदेव गवळी, शेख अल्ताफ, अब्दुल लतीफ, अश्फाक अहमद बागवान आदींसह कार्यकर्ते धरणे आंदोलनात उतरले होते.