शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनासाठी टांग्याने येणारे भाविक अन् लाकडी पाळणा...

By admin | Updated: September 23, 2014 01:39 IST

संतोष हिरेमठ , औरंगाबाद नवरात्रोत्सवात भरणाऱ्या कर्णपुरा यात्रेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. चारशे वर्षांपूर्वी राजा कर्णसिंह यांनी देवीची स्थापना केली. यात्रेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.

संतोष हिरेमठ , औरंगाबादनवरात्रोत्सवात भरणाऱ्या कर्णपुरा यात्रेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. चारशे वर्षांपूर्वी राजा कर्णसिंह यांनी देवीची स्थापना केली. यात्रेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. शहर छोटे असताना मंदिराच्या परिसरातच यात्रा भरायची. यात्रेला टांग्याने भाविक येत होते. त्यावेळी लाकडाचा चार आसनी पाळणा असायचा. बघता बघता शहर वाढले आणि यात्रेचे स्वरूपही भव्य झाले. आज भव्य रहाटपाळणे आणि अन्य खेळणी मोठ्या प्रमाणात येतात. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याचे मंदिराचे पुजारी पोपटराव दानवे यांनी सांगितले. कर्णपुरा मंदिर शहरातील प्राचीन असे देवस्थान आहे. मराठवाड्यातील फार मोठी यात्रा म्हणून नवरात्रोत्सवात भरणारी कर्णपुरा यात्रेची ख्याती आहे. यात्रेनिमित्त दरवर्षी कर्णपुऱ्यातील देवीच्या दर्शनासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज लाखो भाविक येतात. यात्रेसाठी अवघे क ाही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मंदिर संस्थानाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून, भाविकांना सहजरीत्या दर्शन घेता यावे, यासाठी लाकडी खांबांद्वारे दर्शन रांगेची व्यवस्था केली जात आहे. भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. विविध रहाटपाळणे, मनोरंजनाचे विविध खेळ, मुलांसाठी खेळणी, पूजेसाठी लागणारे साहित्य, सजावटीचे साहित्य, विविध घरगुती साहित्य, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापनेने यात्रेला सुरुवात होईल. नवरात्रोत्सवात दररोज पहाटे ३ वाजता देवीची आरती होईल. पहिल्या दिवसापासूनच दर्शनासाठी भाविक गर्दी करीत असल्याने यात्रेच्या कालावधीत संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे.