शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

भीषण आगीत ‘श्री चित्रमंदीर’ खाक

By admin | Updated: April 23, 2016 23:51 IST

उस्मानाबाद : शहरातील समता नगर भागातील ‘श्री चित्रमंदीर’ या चित्रपटगृहाला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़

उस्मानाबाद : शहरातील समता नगर भागातील ‘श्री चित्रमंदीर’ या चित्रपटगृहाला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ ही आग इतकी भीषण होती की आतील पडद्यासह स्टीलचे साहित्यही जळून खाक झाले़ ही आग कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप अस्पष्ट असून, या आगीत मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे़उस्मानाबाद शहरातील समता नगर मधील गोरे कॉम्प्लेक्समध्ये राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे यांचे ‘श्री चित्रमंदीर’ हा चित्रपटगृह आहे़ या चित्रपटगृहात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ अचानक लागलेली आग शेजारी असलेल्या रूग्णालयातील व बाजूच्या कॉलनीतील नागरिकांच्या लक्षात आली़ पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते़ परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावून घेतले़ अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी येवून आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, घटना लक्षात येईपर्यंत आणि अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत चित्रपटगृहातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते़ या दोन्ही अग्निशमनच्या गाड्यांनी आग अटोक्यात आणली़ आग अटोक्यात आणल्यानंतरही आतमध्ये गरम झळा कायम असल्याने कोणाला प्रवेश करता येत नव्हता़ या आगीत चित्रपट गृहातील पडदा, मशनरी, पिओपी, खुर्चा, साऊंड सिस्टीम, यासह इतर स्टिलचे, लोखंडी साहित्यही जळून खाक झाले़ या घटनेबाबत विश्वनाथ शिंदे यांच्या माहितीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)