शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:06 IST

ग्रामपंचायतींचे कारभारी : होतकरू गरजू सदस्यांना गरज मानधनाची --- औरंगाबाद : जिल्ह्यात नुकत्याच ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात अनेक ...

ग्रामपंचायतींचे कारभारी : होतकरू गरजू सदस्यांना गरज मानधनाची

---

औरंगाबाद : जिल्ह्यात नुकत्याच ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात अनेक होतकरू आणि आर्थिक परिस्थिती बिकट, पण गावविकासाची आस असलेल्यांना गावकऱ्यांनी कारभारी बनवले. यात सरपंच आणि उपसरपंचपदांना ठराविक मानधन मिळणार, तर तेवढाच वेळ खर्ची करणाऱ्या सदस्यांना मात्र, चहापानावरच समाधान मानावे लागणार आहे.

६१७ गावांच्या ग्रामपंचायतींत ४६९९ सदस्य निवडून आले आहेत. त्यातून ६१७ सरपंच आणि ६१७ उपसरपंच बनले. लोकसंख्येच्या निकषावर या पदाधिकाऱ्यांना १ ते ५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळेल. मात्र, ज्या सदस्यांचे रोज काम केले, तरच कुटुंब चालते, त्यांची यामुळे अडचण झाली आहे. अनेकांना ते गावात थांबल्यास त्यांच्या जागेवर मजूर लावावा लागतो. त्याची झळ पोहोचत असल्याने अनेकजण सक्रिय कामातून अलिप्त राहताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या सदस्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे किमान त्यांना तरी मानधन मिळावे, अशी भावना ग्रामपंचायत सदस्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

आमदार, खासदारांना पगार, पेन्शन मिळते; तर गावविकासात गावकऱ्यांच्या सेवेत दिवस-रात्र काम करणाऱ्या सदस्यांना मानधन का नको, असा सवालही गावगाड्याचे कारभारी करायला लागले आहेत, तर ज्यांना गरज नाही, ते नाकारतील, परंतु निवडून आल्यावर प्रोत्साहन भत्ता म्हणून तरी मानधन मिळायला हवे, असे सदस्यांचे म्हणणे आहे.

---

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती

६१७

---

निवडून आलेले सदस्य

४६९९

---

सरपंच

६१७

---

सरपंच काय म्हणतात...

--

होतकरू तरुण, शेतकरी निवडणुकीत निवडून आले. ते कामधंदा सोडून गावाच्या विकासासाठी वेळ‌ देतात. त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा. त्यांनाही मानधन मिळाल्यास ते पूर्णवेळ गावाच्या विकासाला देऊ शकतील.

- विशाल गिरी, सरपंच, निंबायती

---

स्वत:चे काम करून गावगाड्याचा कारभार शक्य होत नाही. किमान ज्या सदस्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्या सदस्यांना तरी मानधन दिले पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, ते स्वत:हून नाकारतील.

- गजानन ढगे, सरपंच, आमखेडा

---

रोज कमवून जगणाऱ्यांना, पण गाव विकासाची तळमळ असणाऱ्यांनाही नागरिकांनी निवडून दिले. रोजगार बुडवून घरी राहिल्याने त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम व्हायला नको, पण गावाला त्यांची गरज आहे, अशा सदस्यांनाही कुटुंब चालेल एवढे मानधन मिळावे.

- मनीषा शेळके, उपसरपंच, कुंबेफळ