शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

घरांना जायकवाडी धरणाचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:06 IST

जायकवाडी धरण काठोकाठ भरले असून धरणाच्या लगत असलेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसीत पिंपळवाडी पिराची येथील घरांना या पाण्याचे पाझर फुटल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरण काठोकाठ भरले असून धरणाच्या लगत असलेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसीत पिंपळवाडी पिराची येथील घरांना या पाण्याचे पाझर फुटल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संदीपान भुमरे यांनी या घराची पाहणी करून नागरिकांना उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.जायकवाडी धरण काठोकाठ भरले असून १५२२ फुटाची अंतिम कक्षा ओलांडून पाणी धक्याच्या बाजूला असलेल्या घरांच्या परिसरात जमा झाले आहे. या भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तर ऐरणीवर आला असून घराघरात पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांना घरातील पाणी बाहेर काढावे लागत आहे. धक्का परिसरात येणाºया पाण्यास बांध घालून या पाण्यास मज्जाव केला तर समस्या निकाली निघू शकते, असे यावेळी सरपंच साईनाथ सोलाट यांनी आ. भुमरे यांना सांगितले. त्यांनी सदर ठिकाणची पाहणी करून घराच्या पुनर्वसनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लवकरच मार्ग काढणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, दादा बारे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, सोमनाथ परदेशी, जि.प. सदस्य मनीषा साईनाथ सोलाट, उपसरपंच मुनाफ शेख, भाऊ लबडे, भाऊ लबडे, अनिस शेख, जालिंदर एरंडे, संतोष भिसे, अनिल रोडे आदींंची उपस्थिती होती. पिंपळवाडी हे पुनर्वसित गाव असून ते जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धक्क्यालगत आहे. या परिसरात पावसाचे पाणी, औरंगाबाद महानगरपालिकेच्या लिकेज जलवाहिनीचे पाणी व धरणातील पाझरते पाणी हे एका ठिकाणी साचत असल्यामुळे या ठिकाणच्या नागरीकांचे सध्या मोठे हाल होत आहेत. येथील ५८ घरांचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच साईनाथ सोलाट यांनी आ. भुमरे यांना पाहणीसाठी गावात बोलविले होते.