शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

अभियांत्रिकीचे होम सेंटर रद्द करणारच

By admin | Updated: May 20, 2017 00:26 IST

अभियांत्रिकीचे होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करणाऱ्या परीक्षा विभागाने कोणतेही काम केले नाही.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 20 - अभियांत्रिकीचे होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करणाºया परीक्षा विभागाने कोणतेही काम केले नाही. यामुळे ऐनवेळी होम सेंटर कायम ठेवावे लागले. याबाबत ह्यलोकमतह्णने घेतलेली भुमिका अगदी योग्य होती.  लोकमतच्या विरोधात आमच्या कर्मचाºयांनी आंदोलन केले. मात्र शेवटी साई अभियांत्रिकी प्रकरणामुळे सर्व सत्य समोर आले. यामुळे आगामी परीक्षेपासून अभियांत्रिकीच्या परीक्षा अल्फाबेटीकलनुसार घेण्यात येतील. काहीही झाले तरी होम सेंटर ठेवणारच नसल्याची स्पष्ट भुमीका कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराविषयी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेत अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा राजीनामा घेत त्यांच्या जागी डॉ. राजेश रगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षा विभागातील अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या सात कर्मचाºयांच्या तडकाफडकी बदली करण्यात आली. तर साई इजिनिअरिंग महाविद्यालयाचे संलग्निकरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे समायोजन इतर अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय साई इजिनिअरिंग परीक्षा केंद्राचे प्रमुख अमित कांबळे, सहकेंद्रप्रमुख प्रा. अभिजित गायकवाड आणि प्राचार्य संतोष देशमुख यांना परीक्षेच्या कामातून कायमस्वरुपी वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सर्व प्राध्यापकांची मान्यता रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे. याशिवाय महाविद्यालयाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. तीन सदस्यांची समिती स्थापना साई इंजिनीअरिंग महाविद्यालयातील घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. एम. डी. सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्याची घोषणा कुलगुरूंनी केली. या समितीमध्ये एम.पी. लॉचे प्राचार्य डॉ. सी.एम. राव आणि डॉ. प्रविण वक्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. राव उपलब्ध झाले नाहीत डॉ. साधना पांडे यांचा समितीत समावेश करण्यात येईल. उच्चशिक्षण राज्यमंत्र्यांकडून सुचना राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी साई अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणासंबंधी विद्यापीठाला अनेक सुचनांचे पत्र पाठवले असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. यात तात्काळ उत्तरपत्रिका गोळा करणे, सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे आणि त्याची सीडी बनवणे, महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्याच्या सूचनाही वायकर यांनी केल्या आहेत. पेपरच्या दिवशीच उत्तरपत्रिका गोळा करणार अभियांत्रिकीचा पेपर झाल्यानंतर त्याच दिवशी सर्व परीक्षा केंद्रावरून उत्तरपत्रिका गोळा करण्यात येणार आहेत. या उत्तरपत्रिका दोन-चार दिवस परीक्षा केंद्रावरच ठेवण्यात येत असल्याचे माहित नव्हते. याची साधी कल्पनाही परीक्षा विभागाने आपल्याला दिली नव्हती, असे कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आता यापुढे एकही परीक्षा केंद्रावर एकही दिवस उत्तरपत्रिका ठेवण्यात येणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत कुलगुरू हाय... च्या घोषणा कुलगुरू डॉ. चोपडे यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येत कुलगुरू हाय हायच्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले होते. ह्यकुलगुरू चले जावो, कुलगुरू जवाब दोह्ण या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले होते. शेवटी सुरक्षा रक्षकांनी घोषणाकर्त्यांना बाहेर काढले. यात सतीश पट्टेकर, दिपक केदार, नरेश पाखरे, स्वप्निल शिरसाठ, रोहित जगधने, विशाल नवगिरे, दिपक डांगरे, किरण तुपे आणि आकाश तायडे या कार्यकर्त्यांचा समावेश होता.