शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये शेतकरी, व्यापा-यांनी बंद पाडला जनावरांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:41 IST

बाजार समितीच्या आवारात अवैध रितीने सुरू असलेल्या भूखंडाचे बांधकाम बंद करून ते पाडावे. जनावरे खरेदी-विक्री करणा-या व्यापा-यांना तातडीने परवाने द्यावेत. जनावरांच्या आठवडेबाजारात सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी शनिवारी शेतकरी, व्यापा-यांनी जनावरांचा बाजार बंद पाडला. 

जामखेड  : बाजार समितीच्या आवारात अवैध रितीने सुरू असलेल्या भूखंडाचे बांधकाम बंद करून ते पाडावे. जनावरे खरेदी-विक्री करणा-या व्यापा-यांना तातडीने परवाने द्यावेत. जनावरांच्या आठवडेबाजारात सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी शनिवारी शेतकरी, व्यापा-यांनी जनावरांचा बाजार बंद पाडला.  जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (दि १४ सप्टेंबर) आठवडेबाजार असतो. मात्र शनिवारी सकाळीच संतप्त झालेल्या व्यापारी व शेतक-यांनी या बाजारातील अवैध सुरू असलेले बांधकाम तातडीने बंद करुन ते पाडण्यात यावे या मागणीसाठी जनावरांचा बाजार बंद पाडला. सकाळी वाहनामध्ये घेऊन येणारे जनावरे व्यापा-यांनी रस्त्यात अडवून माघारी पाठवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण बैल बाजारात शुकशुकाट होता.  संतप्त व्यापारी व शेतक-यांनी आपला मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आणला. याठिकाणी धरणे आंदोलन केले. यावेळी सारोळा सरपंच अजय काशीद यांनी बैलाच्या व्यापा-यांंनी परवान्यासाठी अर्ज देऊनही अजून त्यांना परवाने दिले नाही. ते परवाने तातडीने द्यावेत, अशी मागणी केली. बैल बाजारात शौचालय, पाणी व निवा-याची सोय करावी, अशा मागण्या या आंदोलनादरम्यान केल्या. रमेश आजबे म्हणाले, आठ दिवसांत व्यापा-यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आठवड्यातील शनिवारी भरणारा बाजार जामखेड तहसील व पोलीस स्टेशनच्या आवारात भरविण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, व्यापारी फिरोज कुरेशी, पप्पू काशिद, दत्तात्रय जगदाळे, संभाजी काशिद, हरिभाऊ खवळे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी व शेतकरी सहभागी झाले होते.आश्वासनानंतर आंदोलन मागे सभापती गौतम उतेकर यांनी मोर्चेक-यांच्या भावना जाणून घेतल्या. भूखंडाचे सुरू असलेले बांधकाम तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे. बैलांचा व शेळी बाजार कुठेही दुसरीकडे हलविण्यात येणार नाही. जनावरांचा व्यापार करणारे व्यापारी यांना तातडीने परवाने देण्यात येतील. बाजार समितीच्या आवारातील वृक्षतोड तोड होणार नाही. लवकरच शौचालयाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. तातडीने संचालक मंडळांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर