कळंब : मागील भांडणाची कुरापत काढून वडील व मुलास तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील कन्हेरवाडी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्हेरवाडी येथील सुभाष भास्कर काळे यांच्या भावास व वडिलास आरोपीनी संगनमत करून धक्काबुक्की केली. तसेच तलवारीने वार करून जखमी केले, अशी फिर्याद सुभाष काळे यांनी दिली. यावरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, तपास पोउपनि पठाण करीत आहेत. किरकोळ कारणावरून मारहाणउस्मानाबाद : दुचाकीला धक्का लागल्याचा जाब विचारल्यावरून एकास मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरातील मारवाडी गल्ली भागात बुधवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारस घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील सांजा येथील श्रीकांत ऊर्फ महेश हणमंत लोंढे हे बुधवारी दुपारी येथील मारवाडी गल्लीत आले होते. यावेळी बंटी बनसोडे (रा. भीमनगर) व रोहन कसबे (रा. सांजारोड) यांच्या दुचाकीचा लोंढे यांच्या दुचाकीला धक्का लागला. लोंढे यांनी याचा जाब विचारल्यावरून बनसोडे व कसबे यांनी त्यांना मारहाण केली. यात लोंढे जखमी झाले. याप्रकरणी लोंढे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ कुरेशी करीत आहेत.
मागील भांडणावरून तलवारीने मारहाण
By admin | Updated: August 18, 2016 00:54 IST