शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात बसणार ऐतिहासिक पथदिवे

By admin | Updated: May 27, 2017 00:37 IST

तुळजापूर :शहरातील दोन रस्त्यांवर ऐतिहासिक शैलीचे पथदिवे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला

लोकमत न्यूज नेटवर्कतुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी असते. हीच बाब लक्षात घेवून आता शहरातील दोन रस्त्यांवर ऐतिहासिक शैलीचे पथदिवे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. यासोबतच राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुने ‘सर्व्हिस’ रस्ते विकसित करण्याचेही यावेळी निश्चित झाले. तुळजापूर विकास प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानबााद येथे पार पडली. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष पंडित जगदाळे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगावकर, पोनि राजेंद्र बोकडे, पालिका मुख्याधिकारी राजीव बुबणे, तहसीलदार दिनेश झांपले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.तब्बल एक वर्षानंतर शुक्रवारी नतून जिल्हाधिकारी गमे यांनी प्राधिकरणाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. तुळजापूर शहरामध्ये सतत भाविकांची गर्दी असते. या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने बैैठकीमध्ये चर्चा होवून अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली. शहरातील भवानी मंदिर ते शुक्रवारपेठ पाण्याची टाकी तसेच शिवाजी चौक ते भवानी मंदिर महाद्वार या दोन रस्त्यांवर पुरातन पथदिवे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राष्ट्रीय आणि राज्य मार्गाच्या दोन्ही बाजुचे सर्व्हिस रस्ते वितकसित करण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. दरम्यान, तुळजापूर (खुर्द) येथील सभागृह, सुलभ शौचालय बांधणे, शहरातील आराधवाडी, घाटशीळ रोड ईदगा मैदान, शुक्रवार पेठ, मटन मार्केट याठिकाणी सुलभ शौचालय उभारण्यासही हिरवा कंदिल मिळाला. दरम्यान, प्राधिकरणाअंतर्गत अर्धवट राहिलेल्या कामांना प्रथम प्राधान्य देवून ती कामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचनाही संबंधित कंत्राटदारास जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.