शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीचा सोलापूरवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:55 IST

अनुभवी खेळाडू सन्नी पंडित याची जादुई फिरकी गोलंदाजी आणि सत्यजित नायक व संदीप पाटील यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर हिंगोली संघाने पुणे येथे एमसीएच्या सिनिअर साखळी क्रिकेट स्पर्धेत पुणे येथील लढतीत सोलापूर संघावर एक डाव आणि १६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सन्नी पंडितने या सामन्यात ९५ धावांत एकूण ११ गडी बाद केले.

ठळक मुद्देएमसीए स्पर्धा : सन्नी पंडितचे ९५ धावांत एकूण ११ बळी, सत्यजित, हर्षद, संदीपही चमकले

औरंगाबाद : अनुभवी खेळाडू सन्नी पंडित याची जादुई फिरकी गोलंदाजी आणि सत्यजित नायक व संदीप पाटील यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर हिंगोली संघाने पुणे येथे एमसीएच्या सिनिअर साखळी क्रिकेट स्पर्धेत पुणे येथील लढतीत सोलापूर संघावर एक डाव आणि १६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सन्नी पंडितने या सामन्यात ९५ धावांत एकूण ११ गडी बाद केले.सत्यजित नायक याची भेदक गोलंदाजी आणि सन्नी पंडितच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर हिंगोलीने सोलापूरचा पहिला डाव १३८ धावांत गुंडाळला. सोलापूरकडून अक्षय हवाले याने सर्वाधिक १९ धावा केल्या. सत्यजित नायक याने ५९ धावांत ४ गडी बाद केले. त्याला सन्नी पंडितने ४० धावांत ४ गडी बाद करीत साथ दिली. ज्ञानेश्वर शिंदे व एस. खांडेगावकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर हिंगोलीने पहिल्या डावात २९३ धावा करीत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. त्यांच्याकडून हर्षद मेहेरने ९१, संदीप पाटीलने ५७ व संदेश पटीलने ३७ धावांचे योगदान दिले. सोलपूरकडून झेद उस्ताद याने ८६ धावांत ५ गडी बाद केले. पहिल्या डावात १५५ धावांनी पिछाडीवर पडलेला सोलापूरचा संघ सन्नी पंडितच्या जादुई गोलंदाजीसमोर दुसºया डावात १३९ धावांत ढेपाळला. सोलापूरकडून दुसºया डावात शहानूर नदाफ याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. सन्नी पंडितने दुसºया डावात ५५ धावंत ६ गडी बाद केले. त्याला अभिनव कांबळेने २ व सत्यजित नायकने १ गडी बाद करीत साथ दिली.संक्षिप्त धावफलकसोलापूर : पहिला डाव : १३८. (अक्षय हवाले १९, सत्यजित नायक ५/५९, सन्नी पंडित ४/४०). दुसरा डाव : १३९. (शहानूर नदाफ ४२. सन्नी पंडित ६/५५, अभिजित कांबळे २/२६, सत्यजित नायक १/२९).हिंगोली (पहिला डाव) : ५५.१ षटकांत सर्वबाद २९३. (हर्षद मेहेर ९१, संदीप पाटील ५७, संदेश पाटील ३७, स्वप्नील इंगळे २४, ज्ञानेश्वर शिंदे २१. झैद उस्ताद ५/८६).