हिंगोली : जिल्हा हिवताप कार्यालय व ए. बी. एम. शाळेच्या वतीने जिल्हय़ातील सर्व गावांत कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी जनजागृती राबविण्यात येणार आहे. १५ नाव्हेंबर रोजी हिंगोलीत डेंग्यू आजाराबाबत जनजागृतीनिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जी. के. चव्हाण यांनी स्वच्छता आणि आरोग्यासंबधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच याबाबत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक दिलीप बांगर, मुख्याध्यापक सिजो. एम जोश, सी. जी. रणवीर, एस. पी. काळे, आर. बी. जोशी, जी. व्ही. शिंदे, पी. एस. तुपकरी, आर. एस. दरगु, घुले, गवळी, बोरबले, कटारे, घोगरे, चौफाडे, नलगे, पतंगे आदींची उस्थिती होती./(प्रतिनिधी)
हिंगोलीत जनजागृती फेरी
By admin | Updated: November 17, 2014 12:20 IST