शहरं
Join us  
Trending Stories
1
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
2
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
3
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
4
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
5
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
6
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
7
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; आतापर्यंत ११ जण ठार, ३३ जखमी!
8
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
9
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
10
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
11
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
12
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
13
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
14
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
15
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
16
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
17
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
18
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

अपहृत माय-लेकाची चोवीस तासात सुटका

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

नळदुर्ग : ऊसतोड मुकादमाला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या पत्नीसह, मुलाचे २० मे रोजी दुपारी अपहरण करण्यात आले होते़ नळदुर्ग पोलिसांकडे शनिवारी तक्रार दाखल होताच

नळदुर्ग : ऊसतोड मुकादमाला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या पत्नीसह, मुलाचे २० मे रोजी दुपारी अपहरण करण्यात आले होते़ नळदुर्ग पोलिसांकडे शनिवारी तक्रार दाखल होताच २४ तासाच्या आत त्या अपहृत महिलेसह मुलाची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी संबंधिताविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील एन.एस.एल. शुगर फॅक्टरीमध्ये ऊसतोड टोळी पुरविणे, वाहतूक करण्यासाठी सुभाष भिकू राठोड (रा़ संगोळगी तांडा ता़आळंद जिग़ुलबर्गा) यानी जळकोट (ता़तुळजापूर) येथील अलीयाबाद तांड्यावरील सुनिल तारू राठोड यास ५ लाख ३५ हजार रूपये दिले होते़ दरम्यान, सुनिल राठोड यांनी सुभाष राठोड यास ४ लाख रूपयाची परतफेड होईल असे काम केले़ उर्वरित १ लाख ३५ हजार रूपये वसूल होत नसल्याने सुभाष राठोड यांनी इतर तिघाजणांसोबत जीपमधून २० मे रोजी जळकोट गाठले़ सुनिल राठोड, त्याची पत्नी व मुलाला हिशोब करायचा आहे म्हणून जीपमध्ये घालून नेले़ त्यानंतर सुनिल राठोड याला सोडून त्याची पत्नी व मुलाला पळवून नेल्याची तक्रार सुनिल राठोड यांनी २३ मे रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली होती़ तक्रार दाखल होताच सपोनि फुलचंद मेंगडे यांनी सहकाऱ्यांसमवेत तपासाची चक्रे फिरवून २४ तासाच्या आत संगोळगी (ता़आळंद) येथून अपहृत महिलेसह मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली़ ही कारवाई पोउपनि जी़एच़पठाण, हेकॉ अकोतकर, पोकॉ भोळे यांनी केली़ या प्रकरणी सुभाष राठोड याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दरम्यान, नळदुर्ग पोलिस तपासादरम्यान संगोळगी (ता़आळंद) येथे गेले असता आरोपी राठोड हा तेथून फरार झाला. (वार्ताहर)