शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी

By admin | Updated: June 26, 2016 00:46 IST

औरंगाबाद : आतापर्यंत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत चांगलीच हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंत सिल्लोड तालुक्यातील

औरंगाबाद : आतापर्यंत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत चांगलीच हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंत सिल्लोड तालुक्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. कन्नड, खुलताबाद, सोयगाव, फुलंब्री तालुक्यातील इतरही अनेक मंडळांमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे आता खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक भागांत अद्याप पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. त्यातच शुक्रवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. शुक्रवारपासून शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत चोवीस तासांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी अधिक पाऊस झाला.सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक सरासरी ३७.३९ मि. मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील सिल्लोड (८२), अजिंठा (६६) आणि निल्लोड (९०) या तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे कन्नड तालुक्यात चिंचोली लिंबाजी मंडळात ५४ मि. मी., करंजखेडा मंडळात ४१ मि. मी. आणि नाचनवेल मंडळात ३० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यात सर्वाधिक ४७ मि. मी. पावसाची नोंद बाजारसावंगी मंडळात झाली. पैठण तालुक्यात बहुतेक भागांत पाऊस पडला नसला तरी बिडकीन मंडळात मात्र, ५७ मि. मी. पावसाची नोंद झाली. यासोबतच सोयगाव मंडळात २५ मि.मी., पिशोर मंडळात २६ मि. मी., वडोदबाजार मंडळात २२ मि. मी. असा समाधानकारक पाऊस झाला. जिल्ह्याचा एकत्रित विचार करता जिल्ह्यात सरासरी १५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे आता जिल्ह्यात पेरण्यांना वेग येणार आहे. अनेक भागांत पेरणीयोग्य ओल आल्यामुळे शेतकरी कापूस लागवड करीत आहे.