बिलोली : नांदेड-नरसी-तेलंगणा सीमेपर्यंत झालेल्या हैदराबाद राज्य महामार्गाच्या संबंधात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खाजगी कंपनीची मिलीभगत दिसत असून वाहनधारकांच्या सोयी-सुविधांची वाट लागली आहे़ दरम्यान, बिलोली-नरसी या २० कि़ मी़ अंतरादरम्यान १८ स्पीड ब्रेकर असल्याचे पुढे आले़ विशेष म्हणजे परमीटरूमसमोर देखील नियमबाह्य बेधडक अडथळे बांधण्यात आले़राज्य महामार्ग २२७ हा दोन राज्यांसह दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे़ दिल्ली-कन्याकुमारी पाठोपाठ अकोला-हैदराबाद, विदर्भ-तेलंगणा असा महामार्ग म्हणून देखील परिचित आहे़ त्याचप्रमाणे तिरुपती-बालाजीसाठी जाणारा रस्तादेखील म्हणून ओळखला जातो़ असा महामार्ग कर्नाटकच्या बीदरकडेदेखील जातो़नांदेड-नरसी-देगलूर त्याचप्रमाणे नांदेड-नरसी-बिलोली तेलंगणा सीमापर्यंत टोलवसुलीनुसार खाजगी मार्ग करारबद्ध आहे़ अशा मार्गावर असंख्य त्रुटी असून सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यालयात बसून अंदाजपत्रके केली आहेत़ महामार्गावर नियमानुसार स्पीडब्रेकरची परवानगीच नसते़ अपघात होवू नये म्हणून गाव तिथे चौपदरी मार्ग व दुभाजक आवश्यक आहे़ त्याचप्रमाणे महामंडळाच्या गाड्या गाव तिथे थांबण्यासाठी बस-बे ची सुविधा अनिवार्य आहे़ अपघातावर नियंत्रण राहण्यासाठी ट्रॅफिक कंट्रोल व्हाईट बँड असणे बंधनकारक आहे़ जिथे गाव येते त्यापूर्वीच दोनशे मीटर दोन्ही बाजूला अशा सोयी आवश्यक आहेत़ महामार्गाच्या रुंदीकरण आणि विस्तारिकरणासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा अथवा खाजगी कंपनीकडे सोपविताना संपूर्ण अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक आहे़ पण बिलोली, नांदेड, मुखेडच्या अभियंता अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून खाजगी कंपनीचे हित जोपासल्याचे मत एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले़शिक्षण विभाग गाफील - लोहगावजवळ अवघ्या महामार्गापासून पाच फूट अंतरावर इंग्रजी शाळेला परवानगी देण्यात आली़ महामार्गावर प्रचंड वाहतूक असते, अशा स्थितीत शाळेतही वाहन घुसू शकते तर चिमुकले बाहेर आले तर काय स्थिती असेल ही बाब गंभीर आहे़ आता अशा खाजगी शाळेसमोर स्पीडब्रेकर बांधून सावरासावर केली जात आहे़महामार्गावर परमीट रूम वाढले - महामार्गाचे रुंदीकरण होताच परमीट रूम बिअरबारची संख्या वाढली आहे़ परिणामी अपघातासाठी हे देखील एक कारण ठरत आहे़ (वार्ताहर)बिलोली- नरसी दरम्यान १८ अडथळे बिलोली-नरसी मार्ग तीनपदरी असून अपघात टाळण्यासाठी अशा नियमावलीचे पालनच झाले नाही़ उलट रस्ता साफ-सुतरा व गुळगुळीत झाल्याने वाहनाची गती वाढली व अपघाताचे प्रमाण वाढले आणि महिनाभरात २० जण अपघातात ठार झाले़ मूळ सुधारणा करण्याऐवजी आता अपघाताचा पर्याय म्हणून बेधडक स्पीडब्रेकर बांधण्यात आले़ विश्ोष म्हणजे, विजयनगर आणि नरसी येथील परमीटरूमसमोरही स्पीडब्रेकर बांधून नियमावलींची वाट लावण्यात आली़ बिलोली-नरसी या २० कि़मी़पर्यंत अठरा स्पीडब्रेकर बांधण्यात आले़ बिलोली-२, विजयनगर-६, कासराळी-३, पाचपिंपळी-२, तळणी-२, लोहगावफाटा-२, लोहगाव-२, लोहगाव शाळा-२, गंगा बारसमोर-२.
महामार्गाची लागली वाट
By admin | Updated: July 5, 2014 00:42 IST