शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट, स्कोडा विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:43 IST

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या ६ व्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हायकोर्ट संघाने एमआयटी रुग्णालयाचा तर स्कोडाने लिप फास्टनर संघाचा पराभव केला. मनोज शिंदे व संदीप खोसरे हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या ६ व्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हायकोर्ट संघाने एमआयटी रुग्णालयाचा तर स्कोडाने लिप फास्टनर संघाचा पराभव केला. मनोज शिंदे व संदीप खोसरे हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात हायकोर्ट संघाने ६ बाद १३७ धावा केल्या. त्यांच्याकडून ज्ञानेवर पटीलने ३० चेंडूंत ६ चौकार, एका षटकारासह ४७ व कुणाल काळे याने ३ चौकार व एका षटकारासह ३२ धावा केल्या. एमआयटीकडून साईनाथ डहाळे व सारंग कांबळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमआयटी रुग्णालय १८.२ षटकांत ८६ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून केदार काळेने १६ व अरविंद पाटीलने १५ धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून मनोज शिंदेने १६ धावांत ५ गडी बाद केले. आबा शिंदे व पवन इप्पार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात लिप फास्टनरने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२८ धावा केल्या. त्यांच्याकडून राजू मदन याने ५० चेंडूंत २ षटकार व ७ चौकारांसह ६३, राहुल पाटीलने २५, रवी लेंडाले याने १७ धावा केल्या. स्कोडाकडून मंगेश गरड व संदीप खोसरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. योगेश भागवत व विजय मेहेत्रे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात स्कोडा संघाने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून विजय हंडोरे याने २६ चेंडूंत ३ षटकार व २ चौकारांसह ३५, अभिजित भगतने २९ व संदीप खोसरेने २२ धावांचे योगदान दिले. लिप फास्टनरकडून राजू मदन याने २, तर प्रणव राजळे याने १ गडी बाद केला.