ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. १९ : महापालिकेच्या सर्वौच्च सभागृहात आज दुपारी ' वंदे मातरम् ' वरून सदस्यांमध्ये ' हाय व्होल्टेज ड्रामा' चांगलाच रंगला. 'वंदे मातरम्' ला आज विरोध दर्शविणारे एमआयएमचे सय्यद मतीन व कॉंग्रेसचे च्या सोहेल शेख हे नगरसेवक मागील ३ वर्षापासून ' वंदे मातरम् ' सुरु असताना उभे रहात असत. ते आजच बसून का होते ? सभेत निलंबित अधिकाऱ्यांना कामावर घेतल्याचा विषय येऊ नये म्हणून १ दिवस आधीच या ' हाय व्होल्टेज ड्रामा ' ची पटकथा सर्वच राजकीय पक्ष्याच्या वतीने लिहिल्याची चर्चा यावेळी मनपात जोर पकडत होती.
दुपारी सर्वसाधारण सभा सुरु होताच ' वंदे मातरम्' सुरु असताना एमआयएम व कॉंग्रेसचे दोन नगरसेवक बसून राहिले. यावर शिवसेना व भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. याला विरोधी सदस्यांनी हि जोरदार विरोध दर्शवला. याच दरम्यान दोन्ही बाजूची नगरसेवक आपसात भिडले. सदस्यांकडून जोरदार घोषणा, रेटारेटी व माईकची तोडफोड करण्यात आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. शिवीगाळ केल्यावरून एमआयएम चे नगरसेवक जफर बिल्डर यांना पोलिसांनी सभागृहा बाहेर नेले. याच गोंधळात अखेर महापौरांनी 'वंदे मातरम्' सुरु असताना बसून राहिलेल्या एमआयएमच्या सय्यद मतीन व कॉंग्रेसच्या सोहेल शेख यांना १ दिवसासाठी निलंबित केले.
निलंबित अधिकाऱ्यांच्या विषयाला बगल देण्यासाठी ' ड्रामा'
'वंदे मातरम्' ला आज विरोध दर्शविणारे एमआयएमचे सय्यद मतीन व कॉंग्रेसचे च्या सोहेल शेख हे नगरसेवक मागील ३ वर्षापासून ' वंदे मातरम् ' सुरु असताना उभे रहात असत. यामुळे आजचा त्यांना विरोध करण्याचे कारण काय ? मनपाच्या सभेत निलंबित अधिकाऱ्यांना कामावर घेतल्याचा विषय येऊ नये म्हणून १ दिवस आधीच या ' हाय व्होल्टेज ड्रामा ' ची पटकथा सर्व राजकीय पक्षांनी लिह्ल्याची यावरून दिसत आहे. यामुळे दुपारी सभा सुरु होताच या ड्राम्याचा अंक सुरु झाला.
दुपारी १ वाजता सभा तहकूब करण्यात आली. १. 30 मी. परत सभा सुरु होताच ' वंदे मातरम् ' व सभागृहात अपशब्द वापरले या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळास सुरुवात झाली.