शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडून सुनावणीसाठी येणा-या शिक्षकांना हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:42 IST

शाळा सोडून बदल्यांच्या याचिकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गर्दी करणा-या शिक्षकांना शुक्रवारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शाळा सोडून बदल्यांच्या याचिकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गर्दी करणा-या शिक्षकांना शुक्रवारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला. शिक्षक शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची टिपणी करून न्यायालयाने २७ आणि २९ सप्टेंबर या दोन दिवशी ज्या याचिकाकर्त्या शिक्षकांनी रजा टाकल्या आहेत त्या नामंजूर करून अनुपस्थिती लावण्याचे आदेश न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले.१२ सप्टेंबर रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकांवर खंडपीठात सुनावणी झाली. आता या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरला ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत शासन आदेशाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे निवेदन सरकारी वकिलांनी केले, ते खंडपीठाने स्वीकारले. याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळीही शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. असे असताना शिक्षक पुन्हा शुक्रवारच्या सुनावणीवेळी मोठ्या संख्येने खंडपीठात उपस्थित होते.राज्य शासनाने १२ सप्टेंबर रोजी काढलेल्या नवीन शासन निर्णयानुसार होणा-या बदल्यांना स्थगिती द्यावी, तसेच बदल्या रद्द कराव्यात यासाठी प्राथमिक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अकरा याचिका दाखल केल्या आहेत. राज्य शासनाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी नवीन शासन निर्णयाद्वारे शिक्षकांच्या फक्त संवर्ग १ व २ च्या बदल्या या २७ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संवर्ग३ व ४ वर अन्याय करणाराअसल्याने १२ सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात खंडपीठात सहाशेवर शिक्षकांनी ११ याचिका दाखल केल्या आहेत.