लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी सकाळी नमाज अदा करण्यात आल्या. तसेच मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी उसळली होती. पोलिसांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बीड शहरातील मुस्लिम बांधवांनी नाळवंडी रोडवरील जुना ईदगाह, बालेपीर भागातील नवीन ईदगाह, किल्ला मैदानावरील जामा मशीद, राजुरी वेस जवळील मरकज मशीद, बालेपीर दर्गा मशीद, मोमीनपुरा भागातील मक्का मशीद, खासबागमधील तकीया मशीद, जुना बाजार भागातील कादरपाशा मशीद, शहेंशहा नगर भागातील अक्सा मशीद, मेराज, झमझम कॉलनीतील अलिया मशीद अशा शहरातील विविध मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते.पोलिसांचे आभारबकरी ईदच्या सणामध्ये मुस्लिम बांधवांना कसलाही त्रास होणार नाही, यासाठी पोलिसांच्या वतीने चोख नियोजन ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्रास झाला नाही. त्याबद्दल मुफ्ती सय्यद सनाऊल्ला यांनी पोलिसांचे आभार मानले.
जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:08 IST