शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्ती लागू

By admin | Updated: March 15, 2016 01:02 IST

नांदेड : शहरात सोमवारपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती करताना ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशा दुचाकीस्वारांकडून दंड आकारणी केली़

नांदेड : शहरात सोमवारपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती करताना ज्यांच्याकडे हेल्मेट नाही अशा दुचाकीस्वारांकडून दंड आकारणी केली़ विशेष म्हणजे शहरातील बहुतांश दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नाहीत़ दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी शहरात हेल्मेटसक्तीची मोहिम सुरूच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी स्पष्ट केले़ सोमवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौकात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांसाठी ‘पावतीरूपी सापळा’ रचला होता़ वाहतूक शाखेच्या या सापळ्यात पहिल्याच दिवशी २०० हून अधिक दुचाकीस्वार सापडले़ रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील काही भागात ही कारवाई सुरूच होती़ न्यायालयाचे निर्देश आणि मोटार वाहन अधिनियमांचा आधार घेत वाहतूक शाखेने सोमवारी अचानक दुचाकीस्वारांना हेल्मेटची विचारणा केली़ त्यावेळी हेल्मेटची सवयच नसलेल्या दुचाकीस्वारांना दंडाची पावती फाडण्याशिवाय पर्याय उरला नव्हता़ सोमवारी शहरात वजिराबाद, शिवाजी महाराज पुतळा परिसर, तिरंगा चौक, महात्मा फुले चौक आयटीआय, अण्णाभाऊ साठे चौक, जुना मोंढा आदी भागात वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून दंड आकारणी केली जात होती़ वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास नारनवर, पोलिस उपनिरीक्षक ढवळे, पोहेकॉ अजय सावळे, दत्ता घुगे आदी कर्मचाऱ्यांचा या मोहिमेत समावेश होता़ मोहिमेबाबत पोलिस निरीक्षक नारनवर यांनी सांगितले, हेल्मेटसक्तीची मोहिम ही दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठीच आहे़ त्यात कायदाही असून त्याचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे़ अनेक अपघातात दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्याने गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते़ ही मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले़पोलिस अधीक्षक दहिया यांनीही या मोहिमेची गरज असल्याचे सांगितले़ दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती हा विषय नवीन नाही़ या कायद्याची सर्वांनाच माहिती असून दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे़ पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांमध्ये हेल्मेटवापराबाबतचे प्रबोधन केले आहे़ आता कायद्याची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत़ दरम्यान, शहरात रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा पार पडला़ त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच हेल्मेटसक्ती लागू झाली़ अचानक सुरू झालेल्या सक्तीमुळे वाहनधारक मात्र वैतागले होते़ (प्रतिनिधी)